शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला आघाडीत बिघाडी का ? कारण-राजकारण : पंचायत समितीच्या इतिहासातील पहिलीच वेळ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:06 IST

अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे अल्पमतात आलेल्या भाजपच्या प्रा. जयश्री तेली यांना सभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला, ही एक राजकीय घडामोड झाली.

ठळक मुद्देशब्दांनीच ‘कमावले’...शब्दांनीच ‘गमावले’

राम मगदूम ।गडहिंग्लज : अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे अल्पमतात आलेल्या भाजपच्या प्रा. जयश्री तेली यांना सभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला, ही एक राजकीय घडामोड झाली. मात्र, अशी गोष्ट पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्यामुळे त्याची कारणमीमांसा करण्याची आवश्यकता आहे. किंबहुना, भाजप-राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीची बिघाडी का झाली? याचा वेध घेतल्यास शब्दांनीच गमावले, शब्दांनीच कमावले..! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये पंचायत समितीची निवडणूक झाली. त्यावेळी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीच्या विरोधात सर्वच पक्ष-गटांनी सोयीच्या आघाड्या केल्या. त्यामुळेच कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. आघाडीशिवाय सत्ता स्थापन करणे कुणालाही शक्य नव्हते. त्यातूनच ‘भाजप-राष्ट्रवादी-काँगे्रस आणि ताराराणीपैकी अप्पी पाटील गट अशी आघाडी झाली. ‘ताराराणी’मधील ‘स्वाभिमानी’ व हत्तरकी गट बाजूला पडला. परिणामी सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली. म्हणजेच सभागृहात विरोधी पक्षच उरला नाही. त्यामुळेच ‘सभापती’विरूद्ध अविश्वास ठराव का आला? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचा उलगडा होण्यासाठीच ‘अविश्वास नाट्याची’ कारणमीमांसा करायला हवी.असे सांगितले जाते की, जिल्ह्यातील त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार याठिकाणीही भाजप आणि ताराराणी अशीच आघाडी आणि सभापतिपदी विजयराव पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु, शेवटच्या क्षणी ऐनवेळी ‘भाजप-राष्ट्रवादी-काँगे्रस’ अशी आघाडी झाली. त्यामुळे विजयराव यांचे नाव मागे पडून पक्षाच्या अधिकृत उमदेवार म्हणून भाजपने तेली यांना सभापतिपदी बसविले.

त्याचवेळी भाजपचे जिल्ह्यातील नेते आणि गडहिंग्लजमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत सव्वा वर्षानंतर विजयराव यांना संधी देण्याचे ठरले होते. तथापि, कालावधी संपूनदेखील तेलींनी राजीनामा दिला नाही. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे दाद मागूनही न्याय मिळाला नाही. भाजपचे नेते दिलेला शब्द पाळायला तयार नाहीत असे स्पष्ट झाल्यानंतरच त्यांनी ‘राष्ट्रवादी-काँगे्रस’ आघाडीचे दरवाजे ठोठावले. त्यांनाही भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याची आयती संधी मिळाली. त्यामुळेच आघाडीचा धर्म विसरून त्यांनी भाजपबरोबर सत्तेत असतानाही विजयरावांना साथ देण्याचा ‘शब्द’ देवून ‘भाजप’वर निशाणा साधला. अनेकप्रकारे दबाब आणि प्रलोभने येवूनही ‘राष्ट्रवादी-काँगे्रस व ताराराणी’चे सदस्य विजयरावांच्या पाठीशी ठाम राहिल्यामुळेच तेलींना सभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला.सक्षम नेतृत्व, समन्वयाचा अभावभाजपचे गडहिंग्लजमधील नेतृत्व सध्या डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांच्याकडे आहे. तरीदेखील जिल्ह्याच्या नेत्यांनाच ‘गडहिंग्लज’कडे लक्ष द्यावे लागते. बहुतेक नवीन पदाधिकारी अन्य पक्षातून आलेले आहेत. त्यांचा आणि जुन्या कार्यकर्त्यांचा सूर म्हणावा तसा अजूनही जुळलेला नाही. किंंबहुना, वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवून संपूर्ण तालुक्यावर पकड व कार्यकर्त्यांच्या पालकत्वाची भूमिका समर्थपणे निभावणाºया सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळेच पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषदेच्या दोन आणि तीन जागांसह पंचायत समितीची सत्ता मिळूनही ती भाजपला टिकविता आली नाही. त्यामुळे जिल्हा भाजपमय करण्यासाठी मनापासून धडपडणाºया चंद्रकांत पाटील यांच्यासारखा राज्यातील वजनदार नेत्याच्या विजयाच्या वारूला गडहिंंग्लजमध्ये अपशकून झाले आहे.काँगे्रसप्रेमी तालुका... राष्ट्रवादीनेही विसरला आघाडीचा धर्म१९६२ पासून गडहिंग्लज पंचायत समितीवर पूर्वाश्रमीच्या काँगे्रसची आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर २०१७ पर्यंत राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली आहे. १९९२ ते १९९७ या कालावधीत काँगे्रसचे राजकुमार हत्तरकी व जनता दलाचे अ‍ॅड. श्रीपतराव श्ािंदे आणि १९९७ ते २००२ या कालावधीत राष्ट्रवादीचे बाबासाहेब कुपेकर व जनता दलाचे श्ािंदे यांच्या आघाडीची सत्ता होती. दरम्यानच्या कालावधीत ही नेतेमंडळी एकमेकांच्या विरोधात स्वत: लढली. परंतु, पंचायत समितीच्या राजकारणातील आघाडीत कधीच बिघाडी होऊ दिली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणे