शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दादांच्या ‘व्यूहरचने’कडे गडहिंग्लजकरांचे ‘लक्ष’!

By admin | Updated: September 8, 2016 00:29 IST

गडहिंग्लज पालिका निवडणूक : ‘शहापूरकर-चव्हाणां’च्या प्रवेशानंतरच हालचालींना गती

राम मगदूम - गडहिंग्लज --पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोण-कोणती व्यूहरचना आखतात, याकडेच राजकीय जाणकारांसह गडहिंग्लजमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.आमदार हसन मुश्रीफ यांच्या गडहिंग्लज साखर कारखान्यावरील वर्चस्वाला धक्का देण्याचा जोरदार प्रयत्न चंद्रकांतदादांनी कारखान्याच्या निवडणुकीत केला. त्यासाठी त्यांनी जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे आणि डॉ. प्रकाश शहापूरकर या कारखान्याच्या दोन्ही माजी अध्यक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास यश आले नाही. त्यानंतर शिंदे-मुश्रीफ व शहापूरकर-चव्हाणांची युती झाली. त्याचवेळी त्यांनी ‘शहापूरकर-चव्हाण’ या जोडगोळीला ‘भाजप’मध्ये घेण्याचे ठरविले होते.दरम्यान, आठवड्यापूर्वी शहापूरकर व चव्हाण या दोघांनीही खास पत्रकार परिषद घेवून गडहिंग्लज शहर व तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘भाजप’मध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. रविवार (दि. ११) रोजी होणाऱ्या पक्षप्रवेश व शक्तीप्रदर्शनाची दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानंतरच खऱ्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबत कुणा-कुणाचा प्रवेश होतो, याकडेच शहरासह जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. चव्हाण-शहापूरकर कुठे होते ?नगरपालिकेच्या गतवेळच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी ‘जनता दल-जनसुराज्य’ आघाडीचे नेते शिंदे व चव्हाणांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब कुपेकर व मुश्रीफ यांनी पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादीचे पॅनेल ताकदीने रिंगणात उतरविले होते. त्यावेळी शहापूरकरदेखील कुपेकर व मुश्रीफ यांच्यासोबत होते.गतवेळी काय-काय झालं?जागा वाटप आणि उमेदवारीच्या नावावरून गतवेळी जनता दल आणि जनसुराज्य यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे दोन्ही बाजूने बंडखोरी झाली होती. ११ जागा लढविलेल्या जनता दलाला ७ जागा, तर ८ जागा लढविलेल्या जनसुराज्यला केवळ १ जागा मिळाली. १७ जागा लढविलेल्या राष्ट्रवादीला ९ जागा मिळाल्या. एकमेव निवडून आलेले ‘जनसुराज्य’चे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर सुरुवातीला राष्ट्रवादीबरोबर आणि त्यानंतर व आता जनता दलासोबत आहेत. शहापूरकर समर्थक प्रा. रमेश पाटील व दीपा बरगे हे दोघेही राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून ‘घड्याळ’ चिन्हावर लढले. पराभूत झालेल्या प्रा. पाटील यांची शहर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर विजयी झालेल्या बरगे या ५ वर्षे राष्ट्रवादीसोबत राहिल्या.महालक्ष्मी यात्रा समितीकडेही लक्ष‘जनसुराज्य’चे माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे व प्रेमा विटेकरी, माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत या महालक्ष्मी यात्रा समितीच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांनीदेखील अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचे यात्रा समितीमधील अन्य सहकारी पालिकेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडेही शहराचे लक्ष लागले आहे.