शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

धारवाड येथे कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 1, 2015 00:31 IST

कर्नाटक विश्वविद्यालयाच्या मैदानातील रुद्रभूमीत शासकीय इतमामात कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेळगाव : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्यावर धारवाड येथील धारवाड विश्व विद्यालयाच्या रुद्रभूमीत दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्य, कला, संस्कृती आणि इतर क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय, चाहते यांना अश्रू आवरणे कठीण झाले. रविवारी सकाळी अज्ञातांनी कलबुर्गी यांच्या धारवाडमधील कल्याणनगर येथील त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या केली होती. सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून कलबुर्गी यांच्या अखेरच्या प्रवासाला प्रारंभ झाला. फुलांनी सुशोभित वाहनावर त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. अंत्ययात्रेत सहभागी झालेले त्यांचे चाहते कलबुर्गी यांच्या घोषणा देत होते. धारवाड शहरातील प्रमुख मार्गावर फिरून अंत्ययात्रा रुद्रभूमीत आली. कर्नाटक विश्वविद्यालयाच्या मैदानातील रुद्रभूमीत शासकीय इतमामात कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक पोलिसांनी हवेत ३ फैरी झाडून कलबुर्गी यांना आदरांजली वाहिली. यावेळी कर्नाटक राज्याच्या कन्नड आणि संस्कृती खात्याच्या मंत्री उमाश्री, लिंगायत समाजातील अनेक मठाधीश, कर्नाटक विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर, साहित्यिक बी. व्ही. विवेक राय, कला, संस्कृती, संशोधन, साहित्यिक, नाटककार क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि हजारो चाहते यावेळी उपस्थित होते. लिंगायत धर्माच्या वचन परंपरेनुसार कलबुर्गी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आला असून, सीबीआयकडेदेखील हत्येचा तपास देण्याची तयारी असल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे.कलबुर्गींची हत्या करून समतेचे विचार थांबविता येणार नाहीत. भाषेची मर्यादा ओलांडून कन्नड आणि मराठी भाषिक समतेचा विचार समाजात जनतेपर्यंत पोहोचवतील. जनतेत जाऊन कलबुर्गींचे विचार सांगणे हीच कलबुर्र्गींना खरी श्रद्धांजली ठरेल.- धनाजी गुरव (अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र )