शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ऐेवजी साखर...नको रे बाबा! शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:57 IST

साखर कारखान्यांनी उर्वरित एफआरपीऐवजी साखर घेण्याच्या केलेल्या आवाहनाकडे शेतकºयांनी पाठ फिरवली. शुक्रवारी दुसºया दिवशी ‘गुरूदत्त’ कारखान्याकडे एकमेव अर्ज आला असून, उर्वरित

ठळक मुद्देकारखान्यांच्या आवाहनानंतरही ‘गुरूदत्त’ वगळता एकाही कारखान्याकडे अर्ज नाही

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी उर्वरित एफआरपीऐवजी साखर घेण्याच्या केलेल्या आवाहनाकडे शेतकºयांनी पाठ फिरवली. शुक्रवारी दुसºया दिवशी ‘गुरूदत्त’ कारखान्याकडे एकमेव अर्ज आला असून, उर्वरित कारखान्याकडे एकही अर्ज आलेला नाही.

एफआरपीची रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उर्वरित एफआरपीच्या रकमेपोटी साखर देण्याची तयारी दर्शवली आहे. तसे आवाहन कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकºयांना केले आहे. शेतकºयांची पीक कर्जाबरोबरच मध्यम मुदतीची कर्जे असतात. एफआरपीतील ८० टक्के रकमेतून शेतकºयाची कर्ज खाती पूर्ण झालेली नाहीत. उर्वरित कर्जाचा प्रश्न असून, ही कर्जे भरण्यासाठी कारखान्यांनी दिलेली साखर एकतर विकास संस्थांना दिली पाहिजे अथवा साखरेची बाजारात विक्री करून येतील त्या पद्धतीने संस्थांकडे जमा केले पाहिजे. यामुळे शेतकºयांबरोबरच विकास संस्थाही अडचणीत येणार आहेत.

दरम्यान, साखर नेण्याच्या मागणीकडे शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. ‘स्वाभिमानी’ने साखर स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे तरीही शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील कारखान्यांकडे साखरेची मागणी दिसत नाही. शुक्रवारपर्यंत दत्त, शिरोळकडे एकाही शेतकºयाने अर्ज केलेला नाही. ‘गुरूदत्त, टाकळीवाडी’कडे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल मादनाईक यांनी अर्ज केल्याचे समजते.वस्तुविनिमय पद्धतीची आठवणपूर्वी लोकांकडे आर्थिक चलन नसल्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली वस्तू दुसºयाला देऊन त्याच्याकडून हवी असलेली वस्तू घेतली जायची. सध्या पैशाऐेवजी साखर देण्याच्या तयारीने पूर्वीच्या वस्तुविनिमय पद्धतीची आठवण होत आहे. 

मागणी नाही केली तर मिळतील त्यावेळी पैसेसाखर कारखाने एफआरपीच्या कायद्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपडत आहेत. साखर आयुक्तांच्या परवानगीने उर्वरित एफआरपीपोटी त्यांनी साखर देण्याची तयारी दर्शवली. शेतकºयांनी साखर स्वीकारली नाही तर कारखान्याकडे पैसे उपलब्ध झाल्यानंतर ‘लवकरच’ दिले जातील, असे म्हटले आहे. त्यामुळे ‘लवकरच’ म्हटले तरी कारखान्यांना मिळतील त्यावेळीच शेतकºयांच्या हातात हे पैसे पडणार आहेत.

साखरेची मागणी न करण्याचे शेतकरी संघटनेचे आवाहनकोल्हापूर : उर्वरित एफआरपीपोटी कारखानदारांनी साखरेचा दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावावा. शेतकºयांनी साखर मागणीचे अर्ज करू नयेत, असे आवाहन शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी पत्रकातून केले. कारखानदार हे शेतकºयांप्रमाणे कामगार, ऊसतोडणी वाहतूकदार व इतरांनाही साखर देणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. कायद्याने एकरकमी, तीही १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. एकरकमी एफआरपी द्यायची सोडून तिचे तुकडे तर केलेच; पण आता उर्वरित एफआरपीपोटी साखर घेण्याचे आवाहन कारखानदार करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चुकीची मागणी केली. तिचा आधार घेऊन कारखानदार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. एफआरपीऐवजी शेतकºयांना साखर देण्याची तरतूद कायद्यात कोठेच नाही.

साखर घेऊन शेतकरी तिची कोठे विक्री करणार? जर सरकार खरेदीची केंद्रे सुरू करीत असेल तर तसा प्रयोग करण्यास हरकत नाही. पैशाऐवजी साखर घेण्याचे आवाहन करणाºया कारखानदारांनी कामगारांना एकूण पगाराच्या २० टक्के साखर द्यावी. ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, केमिकल-बारदानसह इतर साहित्य खरेदी करणाºयांना २० टक्के साखर देणार का? हा खरा प्रश्न असल्याचे अ‍ॅड. शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, त्यांच्यात सध्या ‘नूरा’ कुस्ती चालू असल्याची टीका अ‍ॅड. शिंदे यांनी केली. आम्ही गप्प बसणार नाही. कारखानदारांविरोधात फौजदारी दाखल करणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने