शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये बकरी-मेंढ्यांसह मोर्चा

By admin | Updated: July 29, 2014 00:02 IST

प्रश्न आरक्षणाचा : हातकणंगलेत तहसील कार्यालयावर धनगर समाजबांधवांची धडक

गडहिंग्लज : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी समाजबांधवांनी बकरी-मेंढ्यांसह प्रांत कचेरीवर मोर्चा काढला. गडहिंग्लज तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी या मोर्चाने बारामतीमधील राज्यव्यापी आंदोलनास पाठिंबा दिला. गडहिंग्लज तालुका धनगर समाज संघ व मल्हार सेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव बँक, संकेश्वर रोड, कांबळे तिकटी ते आयलँड मार्गे प्रांत कचेरीवर आल्यानंतर सभा झाली. धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रांत कचेरीच्या गेटवर चिकटविण्यात आले. सभेत प्रा. विठ्ठल बन्ने, जनता दलाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, धनगर समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांची भाषणे झाली. मोर्चात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, मल्हार सेनेचे उपाध्यक्ष संजय कट्टीकर, प्रा. डॉ. नागेश मासाळ, प्रा. नीलेश शेळके, सिद्धाप्पा भरडी, निंगाप्पा भमानगोळ, विठ्ठल भमानगोळ, अरुण वाघमोडे, सुभाष पुजारी, आप्पासाहेब कट्टीकर, बाळासाहेब वालीकर, शंकर मदिहाळी, सुहास पुजारी, म्हाळू बन्ने, सुहास पुजारी, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)