नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला

By राजाराम लोंढे | Updated: January 25, 2023 14:26 IST2023-01-25T14:25:18+5:302023-01-25T14:26:03+5:30

लोकसभा निवडणुकीत पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये

From development work MLA Satej Patil Criticism of MP Dhananjay Mahadik | नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला

नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या प्रश्नांबाबत आपल्यासह खासदार संजय मंडलिक, माजी खासदार संभाजीराजे यांनी प्रयत्न केल्याने आज हा प्रश्न मार्गी लागला. मात्र नवीन खासदार त्याचे श्रेय घेत असून ते अद्याप विमानातून उतरलेच नसल्याचा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडीक यांना लगावला.

कणेरीवाडी (ता. करवीर) ९ कोटी ३४ लाखांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी खासदार महाडीक यांच्यावर निशाणा साधला. आमदार पाटील म्हणाले, आपण पालकमंत्री असताना जलजीवनाच्या माध्यमातून जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचे काम केल्याने पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सरिता खोत, माजी सरपंच शोभा खोत, सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शिवाजीराव मोरे, प्रकाश खोत, अरुण मोरे उपस्थित होते.

Web Title: From development work MLA Satej Patil Criticism of MP Dhananjay Mahadik