मित्रांनी लावली पैज, अन् पैलवान नवरदेवानं केलं अस काही की...; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 18:27 IST2023-02-27T18:26:56+5:302023-02-27T18:27:40+5:30

कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेचे सर्वत्र कौतुक

Friends made a bet, and Pailwan Navradeva did something like that; The video went viral in kolhapur | मित्रांनी लावली पैज, अन् पैलवान नवरदेवानं केलं अस काही की...; व्हिडिओ व्हायरल

मित्रांनी लावली पैज, अन् पैलवान नवरदेवानं केलं अस काही की...; व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर म्हणजे कुस्तीपट्टूंची खाण. इथल्या मातीत, गावागावांत, गल्लोगल्ली पैलवान आहेत. इथला माणूस पैजेतही मागे नसतो. ती पाळण्यासाठी तो कुठलीच वेळकाळ पाहणार नाही. असाच एक आगळावेगळा कागल तालुक्यातील बानगे गावातील पैजेचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या गावच्या अभिजित सावंत यांचा शुक्रवारी विवाह झाला. त्याच्या लग्नात त्याच्या मित्रांनी पैज लावली आणि या पैलवान गड्याने ती स्वीकारली आणि पूर्णही केली. पैज होती नवरदेवाच्या पोशाखातच सर्वांसमोर लग्नवेदीवर चक्क जोर आणि बैठका मारायची.

पैलवान अभिजित सावंत याने लग्नमंडपातच मित्रांच्या आग्रहाखातर नवरदेवाच्या पोशाखातच मारलेल्या या जोरबैठकांचा हा व्हिडीओ तेथे जमलेल्या वऱ्हाडी मंडळींनी तयार केला आणि आता तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. या अतिशय मजेशीर व्हिडीओला चांगलेच दर्शक मिळत आहेत. या व्हिडीओनंतर कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेचे सर्वत्र कौतुक होते आहे, तसेच कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं लोकप्रिय केल्याबद्दल या नवरदेवाचे अभिनंदनही होत आहे.

Web Title: Friends made a bet, and Pailwan Navradeva did something like that; The video went viral in kolhapur