शुक्रवार पेठेत चौघांचा तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:28 IST2021-05-25T04:28:33+5:302021-05-25T04:28:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील जोशी गल्लीत लाकडी बांबूने हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. देवरथ देवदास वासुदेव ...

On Friday, four persons attacked a youth in Peth | शुक्रवार पेठेत चौघांचा तरुणावर हल्ला

शुक्रवार पेठेत चौघांचा तरुणावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील जोशी गल्लीत लाकडी बांबूने हल्ला केल्याने तरुण जखमी झाला. देवरथ देवदास वासुदेव (वय २२, रा. जोशी गल्ली, शुक्रवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. वासुदेव हे मित्र हर्ष विजय घाटगे व अनिकेत साताप्पा माने यांच्यासोबत अप्पा शेवाळे तरुण मंडळाच्या पायरीवर बसले असताना हल्ला झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात प्रतीक माने, सौरभ कोरवी, राहुल कोरवी, प्रसन्न आयरेकर (सर्व रा. शुक्रवार पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

उद्यानातून मोबाईल चोरी

कोल्हापूर : विचारेमाळ परिसरातील महानगरपालिकेच्या उद्यानात बाकड्यावर झोपलेल्या व्यक्तीचा सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञाताने चोरून नेला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी असिफ महमद इनामदार (वय ३०, रा. रहमान हकीम गल्ली, विचारेमाळ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

कोगे येथून दुचाकी चोरी

कोल्हापूर : कोगे (ता. करवीर) येथे बाळुमामा वसाहतमध्ये घराच्या दारात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लॉक तोडून चोरून नेली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत दुचाकीमालक विष्णू भगवान मांगोरे (वय ३०, रा. कोगे) यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

Web Title: On Friday, four persons attacked a youth in Peth