शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर फ्रॉड कॉलद्वारे गंडा, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 17:01 IST

आर्थिक व्यवहार वाढत असल्याने प्रयत्न

कोल्हापूर : मी मुंबई पोलिस बोलतोय, तुमचा मोबाइल क्रमांक बेकायदेशीर असून, ब्लॉक केला जाणार आहे. तुमचा आधार क्रमांक आमच्याकडे आहे. तुमचे बँक डिटेल्स द्या, एफडी कुठे केली आहे ते सांगा, यूपीआयचा वापर केला जातो का, असे नानाविध प्रश्नांचा भडीमार करून फ्रॉड कॉल येण्याचे प्रकार कोल्हापुरात वाढले आहेत. कॉलवरून अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बोलण्याची भीती घालून बँकेची माहिती, एफडीवरील पैसे वर्ग करण्याचे सांगत सर्वसामान्यांना गंडा घातला जात आहे. दिवाळीमुळे लोकांच्या हातात बोनससह अन्य विविध मार्गाने पैसे येतात हे हेरून अशा कॉलची संख्या वाढली आहे.मंगळवार पेठ परिसरात औषध विक्री करणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिस बोलतोय, असे सांगून व्हिडीओ कॉल आला. त्यामध्ये कॉल करणारा स्वतःला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा (TRAI) कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमचे सिम कार्ड बेकायदेशीर असून, मुंबईतील एका दुकानातून खरेदी केले आहे. तुमचा आधार क्रमांकही माझ्याकडे आहे. या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे, तुम्हाला दोन ते तीन तास बाहेर कोठेही जाता येणार नसल्याचे सांगितले.मुंबई पोलिसांचे ओळखपत्रही संबंधिताने त्याला दाखविले. त्यानंतर त्या तरुणाची तीन तास चौकशी करण्यास सुरुवात केली. गुंतवणूक, खाते क्रमांक आदींचा तपशील विचारला. एफडीमधील पैसे काढून तत्काळ तुमच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा तुम्हाला मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविले जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन-तीन जणांनी त्याच्यासोबत संपर्क साधला. त्या तरुणाने ऑनलाइन कोणतेही व्यवहार करत नसल्याचे सांगितले. तो ऐकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील तुमच्यासोबत बोलणार असल्याचे सांगून एका व्यक्तिला बोलण्यास सांगितले. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार बँकेतील मित्रांना सांगितला. त्यांनी संबंधिताला खडेबोल सुनावल्यानंतर फ्रॉड कॉल बंद झाला.

शुक्रवार पेठेतील एका तरुणाला स्काइप व्हिडीओ कॉल जॉइन करण्यास सांगितले. त्यालाही बॅक डिटेल्स विचारून थोड्यात वेळात ओटीपी येईल, तो तत्काळ देण्याची मागणी केली. मात्र त्या तरुणाने ओटीपी दिला नसल्याने आर्थिक फसवणूक टळली.

कुठे करणार तक्रार?फ्रॉड कॉल आल्यास टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनीकडे याविषयीची तक्रार द्या. त्यांच्याकडे त्या क्रमांकाची ओळख पटवा. त्यासह नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार करु शकता. सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करू शकता. जवळच्या पोलिस स्टेशनसह cybercrime.gov.in द्वारे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी