कोल्हापूर जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचा चौथा बळी: तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर, एकूण रुग्णसंख्या किती.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:13 IST2025-02-21T12:13:12+5:302025-02-21T12:13:28+5:30
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात गिलियन बॅरे सिंंड्रोम या आजारामुळे (जीबी सिंड्रोम) शाहू मिल कॉलनी येथील रंगराव ...

कोल्हापूर जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचा चौथा बळी: तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर, एकूण रुग्णसंख्या किती.. वाचा
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात गिलियन बॅरे सिंंड्रोम या आजारामुळे (जीबी सिंड्रोम) शाहू मिल कॉलनी येथील रंगराव गणपतराव माने (वय ८०) या वृद्धाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. आरोग्य विभागाने गुरुवारी ही माहिती दिली.
गंगावेश येथील खासगी रुग्णालयात रंगराव माने यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे तसेच जीबी सिंड्रोमची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना १० फेब्रुवारी रोजी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हातापायातील ताकद कमी झाली होती. वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना जीबी सिंड्रोम झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर गेली ९ दिवस सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
शासकीय रुग्णालयात सध्या १२ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी तीन रुग्णांवर व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. दरम्यान, एका १२ वर्षीय मुलीला जीबी सिंड्रोमची लक्षणे दिसत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर बालरोग विभागात उपचार सुरू होते.