शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

फटाक्याला फाटा : झोपडपट्टीतील चौघांना मिळाली दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 11:20 AM

फटाके न उडवता त्या पैशांतून शाळेतीलच चारजणांना दिवाळीला कपडे घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाळली. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे.

ठळक मुद्देझोपडपट्टीतील चौघांना मिळाली दिवाळी भेटशिवाजी मराठाच्या विद्यार्थ्यांनी केली कपड्यांची, धान्याची मदत

कोल्हापूर : फटाके न उडवता त्या पैशांतून शाळेतीलच चारजणांना दिवाळीला कपडे घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाळली. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे.शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी गेली नऊ वर्षे फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा करतात व त्याच पैशातून गरजू सहकाऱ्याला दिवाळीचे कपडे आणतात. या वर्षी लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत; पण तरीही या चांगल्या कामाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून याही वेळी या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन फटाक्यांचे पैसे जमा केले. त्यातून चार मुलांना दिवाळीची कपडे व दोन कुटुंबांना एक महिन्याचे धान्य दिले. या शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील, विशेषत: सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीतच राहतात.या उपक्रमाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. यावेळी करवीरचे गटशिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार प्रमुख पाहुणे होते. सुतार यांच्या हस्ते कपडे देण्यात आले. गेली नऊ वर्षे एका शाळेतील मुले फटाके न उडवता, त्याच पैशांतून आपल्या गरजू सहकाऱ्याला दिवाळीचे कपडे आणतात, ही गोष्ट इतर शाळांसाठी आदर्शवत आहे, असे उद्गार यावेळी विश्वास सुतार यांनी काढले.कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी प्रास्ताविक केले. प्रणाली जाधव हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. त्रिशरण गुदगे याने आभार मानले. चंद्रशेखर तुदीगाल, सुमित तुदीगाल, अमोल मोहिते, आदित्य सावंत, घनश्याम पाटील या विद्यार्थ्यांनीच कार्यक्रमाचे नियोजन केले .शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी दिला हातयावर्षी या शाळेत शिकून बाहेर पडलेल्या १९९८ च्या बॅचचे विद्यार्थीही या उपक्रमाला सहभागी झाले. बाहेरगावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात राहणाऱ्या एका सहकाऱ्याकडे ही रक्कम पाठवून ती मिलिंद यादव यांच्याकडे सुपूर्द केली आहे. 

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीkolhapurकोल्हापूरSchoolशाळा