कोल्हापूर-गोवा राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे जवळ कार उलटली, चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:59 IST2022-02-09T19:53:13+5:302022-02-09T19:59:54+5:30
कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार उलटली

कोल्हापूर-गोवा राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे जवळ कार उलटली, चौघे जखमी
आमजाई व्हरवडे : कोल्हापूर-गोवा राज्यमार्गावर आमजाई व्हरवडे ता. राधानगरी येथे कारचा अपघात झाला. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार उलटली. या अपघात चौघे जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघात झालेल्या कारमधून सहा जण प्रवास करीत होते. हे मालवणहून कोल्हापूरला येत होते. दरम्यान आमजाई व्हरवडे जवळ कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.
यात कार वीस फूट शेतवडीत जावून उलटली. यात चौघे जखमी झाले. अद्याप जखमीची नावे समजू शकली नाहीत. घटनास्थळी मदत कार्य सुरु आहे.