अंत्यदर्शनासाठी निघालेल्या कुटूंबातील चौघेजण अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 14:40 IST2020-10-23T14:38:17+5:302020-10-23T14:40:32+5:30
accident, shivsahi, kolhapurnews, sindhduurg क ळे-कळंबे येथे शिवशाही एसटी बस व कार यांची शुक्रवारी सकाळी समोरासमोर धडक झाली. या अपघातात कोल्हापूरहून कळे गावाकडे निघालेल्या मारुती कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. करण दिपक माळवे (वय २७), संजय दिनकर माळवे (४४), पूजा संजय माळवे (३६) आणि आक्काताई दिनकर माळवे ( वय ६५ सर्व रा. विक्रमनगर) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.

अंत्यदर्शनासाठी निघालेल्या कुटूंबातील चौघेजण अपघातात ठार
कोल्हापूर : क ळे-कळंबे येथे शिवशाही एसटी बस व कार यांची शुक्रवारी सकाळी समोरासमोर धडक झाली. या अपघातातकोल्हापूरहून कळे गावाकडे निघालेल्या मारुती कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. करण दिपक माळवे (वय २७), संजय दिनकर माळवे (४४), पूजा संजय माळवे (३६) आणि आक्काताई दिनकर माळवे ( वय ६५ सर्व रा. विक्रमनगर) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमनगर येथील माळवे कुटूंबिय कळे येथील नातेवाईकाच्या अंत्यदर्शनासाठी निघाले होते. त्या दरम्यान सकाळी साडे नऊ वाजता कणकवली डेपोची शिवशाही बसच्या पुढे जाण्याच्या नादात इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली.
ही धडक इतकी जोरात होती की मारुती कारमधील सातजणांपैकी तीन जण जागीच ठार झाले, तर पूजा माळवे यांचा कसबा बावडा येथील सेवा रग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमीनां अधिक उपचारासाठी सीपीआर तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.