शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
2
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
3
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
4
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
5
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
6
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
7
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
8
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
9
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
10
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
11
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
12
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
13
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
14
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
15
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
16
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
17
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
18
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
19
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
20
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागतालाच कोल्हापूर जिल्ह्यात चार अपघात; सहा ठार, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:55 IST

थर्टी फर्स्टची पार्टी संपवून परतताना सादळे-मादळे येथे दुचाकी घसरून तरुण ठार

कोल्हापूर : नववर्षाच्या स्वागताचे सगळीकडे आनंदी वातावरण असताना पहिल्याच दिवशी जिल्ह्यात चार ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये सहाजण ठार झाले. दोघे गंभीर जखमी झाले. तावडे हॉटेल येथे भरधाव कारने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला. सादळे-मादळे येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. गगनबावडा रोडवर सांगरूळ फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गवंडी ठार झाला. शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्ध ठार झाले. तावडे हॉटेल येथील बसस्टॉपजवळ थंडीमुळे शेकोटीला थांबलेल्या चौघांना भरधाव कारने चिरडले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला. कारचालक मुकेश अरुण अहिरे (वय २९, सध्या रा. कारंडे मळा, कोल्हापूर, मूळ रा. मुंबई) याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.दिलीप आण्णाप्पा पवार (६५, रा. वळीवडे रोड, गांधीनगर, जि. कोल्हापूर), सुधीर कमलाकर कांबळे (४१, रा. घरनिकी, ता. आटपाडी, जि. सांगली) आणि विनयसिंह गौंड (२७, रा. मौरदहा, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. जखमी नवला नारायण शेळके (४५, रा. धनगर गल्ली, कागल) यांच्यावर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक मुकेश अहिरे याची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून, तो सध्या कारंडे मळा येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. कराड येथील एका हॉटेलमध्ये कामासाठी त्याने कर्मचाऱ्यांना पाठवले होते. त्यांना आणायला तो गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास घरातून स्वत:ची कार घेऊन बाहेर पडला. तावडे हॉटेल येथील बसस्टॉपजवळ समोरून आलेल्या वाहनाचा उजेड डोळ्यांवर पडल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. घाईत ब्रेक दाबण्याऐवजी ॲक्सेलरेटर दाबला गेल्याने त्याने रस्त्याकडेला शेकोटीजवळ थांबलेल्या चौघांना उडवले.तिघांना काही अंतर फरफटत नेऊन त्याची कार थांबली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. काही रिक्षाचालकांनी रुग्णवाहिका बोलावून शाहूपुरी पोलिसांना अपघाताची माहिती कळवली. पोलिस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांनी पथकासह तातडीने अपघातस्थळी पोहोचून मृतांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. कारचालक अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला.शेकोटी जिवावर बेतलीगांधीनगर येथे राहणारे दिलीप पवार यांचा जनरेटरचा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते बाहेरगावी निघाले होते. आटपाडी तालुक्यातील सुधीर कांबळे यांची सासुरवाडी गांधीनगरमध्ये असल्याने ते बुधवारी पाहुण्यांकडे आले होते. गावाकडे लवकर जायचे असल्याने ते गुरुवारी सकाळी तावडे हॉटेल येथील बसस्टॉपवर पोहोचले होते. मध्यप्रदेशातील विनयसिंह गौंड हा कामाच्या शोधात कोल्हापुरात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मेंढपाळ नवला शेळके हे बाहेरगावी जाण्यासाठी बसस्टॉपवर गेले होते. थंडी असल्याने ते स्टॉपजवळ शेकोटीच्या उबीला थांबले होते. त्यानंतर काही वेळातच काळ बनून आलेल्या कारने तिघांना चिरडले.चालकाला पार्टीची धुंदीचालक अहिरे हा बुधवारी रात्री थर्टी फर्स्टच्या निमित्ताने फ्लॅटवर दारू पीत बसला होता. रात्री उशिरा झोपल्यानंतर सकाळी लवकर उठून तो कराडला निघाला होता. त्याच्या चेहऱ्यावर पार्टीची धुंदी होती. त्याची वैद्यकीय तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.१८ दिवसांपूर्वीच घेतली कारअटकेतील अहिरे याने १४ डिसेंबरला पांजरपोळ येथील एका कार बझारमधून साडेतीन लाखांना सेकंडहँड कार घेतली. खरेदीची कागदपत्रे अजून त्याच्या नावावर झालेली नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कार जप्त केली आहे.

रुग्णालयातून घरी जाणाऱ्या वृद्धास वाहनाने उडवलेकोल्हापूर : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात उपचार घेऊन घरी निघालेले विलास महादेव हावळ (वय ७५, रा. मोहिते कॉलनी, कळंबा) यांना पाठीमागून आलेल्या वाहनाने उडवले. गंभीर जखमी अवस्थेतील हावळ यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. लाईन बाजार ते शासकीय विश्रामगृह मार्गावर अंडी उबवणी केंद्राजवळ गुरुवारी (दि. १) दुपारी एकच्या सुमारास अपघात झाला.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब्यात राहणारे विलास हावळ हे तब्येत बरी नसल्याने उपचार घेण्यासाठी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात गेले होते. उपचारानंतर ते शासकीय विश्रामगृहाजवळील बसस्टॉपकडे चालत निघाले होते. अंडी उबवणी केंद्राजवळ पाठीमागून त्यांना वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले हावळ यांना सीपीआरमध्ये दाखल केले. गंभीर दुखापतींमुळे त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते महावितरणमधून सेवानिवृत्त झाले होते. या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. धडक देऊन गेलेल्या वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.सांगरुळ फाट्याजवळ वाहनाच्या धडकेत गवंडी ठारकोल्हापूर : काम संपवून कोल्हापुरातून गावाकडे जाताना गगनबावडा मार्गावर सांगरुळ फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील गवंडी बाबू नाऊ कात्रट (वय ४३, रा. वेतवडे पैकी धनगरवाडा, ता. करवीर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी ३१) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवंडी काम करणारे बाबू कात्रट हे बुधवारी रात्री कोल्हापुरात उशिरापर्यंत काम करीत होते. काम संपवून गावाकडे जाताना सांगरूळ फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनधारकांनी १०८ रुग्णवाहिकेला कळवून जखमी कात्रट यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. अपघातामुळे कष्टकरी कात्रट कुटुंबाला धक्का बसला. अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक वाहनासह निघून गेला. करवीर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.थर्टी फर्स्टची पार्टी संपवून परतताना सादळे-मादळे येथे दुचाकी घसरून तरुण ठारकोल्हापूर : सादळे-मादळे येथील एका रिसॉर्टमधील थर्टी फर्स्टची पार्टी संपवून घरी परत येताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात रोहित हिरालाल निरंकारी (वय ३५, रा. गांधीनगर, ता. करवीर) हा जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी (दि. १) सकाळी सहाच्या सुमारास सादळे-मादळे येथील एका वळणावर झाला. याची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली.

शिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित निरंकारी हा बुधवारी रात्री थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी मित्रांसोबत सादळे-मादळे येथील एका रिसॉर्टमध्ये गेला होता. पार्टी संपल्यानंतर तो काही वेळ तिथेच झोपला. सकाळी सहाच्या सुमारास सर्व मित्र घरी परतण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी रिसॉर्टपासून काही अंतरावरच दुचाकी घसरून पडल्याने रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मित्रांनी तातडीने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तो गांधीनगर येथील एका कापड दुकानात काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांचा मुलगा, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur New Year's Accidents Claim Six Lives, Two Injured

Web Summary : Four accidents marred Kolhapur's New Year, claiming six lives. A car crash at Tawade Hotel killed three. Other accidents involved a bike skid, vehicle collision, and pedestrian hit-and-run, leaving two others critically injured.