शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

कुमारवयातच व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी

By admin | Updated: December 2, 2014 00:12 IST

शुभदा दिवाण : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे चर्चासत्र

कोल्हापूर : कुमारवयात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी होत असताना त्यांची ध्येय-निश्चितीही होणे गरजेचे असते, त्यांच्या आयुष्याची दिशा ठरविण्याचे महत्त्व जाणून घेऊन त्यांना योग्य आदर्शाकडे वळवायला हवे. त्यासाठी पालकांनी आवर्जून प्रयत्न करायला पाहिजेत, असे प्रतिपादन समुपदेशक डॉ. शुभदा दिवाण यांनी किले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे रविवारी ‘पौगंडावस्था व सुजाण पालकत्व’ या विषयावर आयोजित पालकसभा व मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या. दिवाण म्हणाल्या, अनेकजण पौगंडावस्था ही आयुष्यातील एक वादळी कालखंड, असे म्हणतात, पण हा कालखंड म्हणजे आयुष्यातील सर्वांत चांगला काळ असतो. या वयात कुमार वयाचे बंधन नसते की, प्रौढपणाची जबाबदारी नसते. त्यामुळे पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी हितगुज केले पाहिजे. ‘पौंगडावस्थेची ओळख’ या विषयावर बोलताना डॉ. दीपा कित्तूर म्हणाल्या, मुलांना सांगा मी तुझ्या बरोबर आहे, तू काळजी करू नकोस, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या वयातसुद्धा मी हेच अनुभवले आहे. हे त्याला पटवून द्या. त्यांच्यावर तुमच्या इच्छा लादू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. निखिल चौगुले यांनी ‘मुलांची वर्तन समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, या वयात मुलांची मानसिकता आई-वडील जे सांगतात ते चुकीचे आहे असे वाटते, तर आपले मित्र-मैत्रिणी जे सांगतात ते बरोबर आहे वाटत असते. त्यामुळे पालकांनी मित्र किंवा मैत्रिण बनून संवाद साधावा. याप्रसंगी तांबोळी यांच्या एच.आय.व्ही / एड्स सर्वांसाठी या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आनंद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. कम्युनिटी सर्व्हिसचे चेअरमन डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. नीता नरके यांनी आभार मानले. कार्यक्रमास . विद्या ठाकूर, डॉ. राजीव कुलकर्णी यांच्यासह पालक उपस्थित होते. रक्त परीक्षा केलीच पाहिजे : तांबोळी ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र तांबोळी यांच्या ‘एच.आय.व्ही/ एड्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अजूनही आपल्याकडे लैंगिक शिक्षणाची अर्धवट माहिती आहे. पालकांना मुलांशी या विषयावर बोलण्याचा संकोच वाटतो. लग्न ठरविताना जशी पत्रिका पाहतो. त्याचप्रमाणे मुला-मुलींची रक्त परीक्षाही केलीच पाहिजे. यासाठी सक्ती करण्याचा कायदा अंमलात आणला पाहिजे.