‘संपतबापूं’च्या अमृतमहोत्सवाला शरद पवार येणार, आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:44 IST2023-01-10T12:44:00+5:302023-01-10T12:44:24+5:30

दहा वर्षे आमदार तसेच विविध पदांवर काम करत असताना पवार यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला  

Former MLA Sampatrao Pawar Amritmahotsav birthday will be attended by NCP President Sharad Pawar | ‘संपतबापूं’च्या अमृतमहोत्सवाला शरद पवार येणार, आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘संपतबापूं’च्या अमृतमहोत्सवाला शरद पवार येणार, आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, सांगरुळचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या २८ जानेवारी रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. शरद पवार यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार होणार आहे.

महाविद्यालयीन जीवनापासून गेली पन्नास वर्षे चळवळीतून सामान्य माणसांच्या प्रश्नांवर रान उठवणारे लढाऊ नेते संपतराव पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. सडोली खालसा (ता. करवीर)चे सरपंच, भोगावत साखर कारखान्याचे संचालक, उपाध्यक्ष ते सांगरुळ मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार अशा विविध पदांवर काम करत असताना पवार यांनी आपल्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त १६ जानेवारीपासून सडोली खालसा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

२० जानेवारी रोजी कुस्ती मैदान तर शरीरसाैष्ठव स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन वाढदिवस समितीने केले आहे. त्याचबरोबर २८ जानेवारी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते व ‘शेकाप’चे नेते आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपतराव पवार यांचा सत्कार होत आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 

Web Title: Former MLA Sampatrao Pawar Amritmahotsav birthday will be attended by NCP President Sharad Pawar