शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाणी नाही... ऊसतोडच जगण्याचा आधार

By admin | Updated: December 12, 2015 00:11 IST

व्यथा ऊसतोड मजुरांच्या : जन्मत: पडते गाठ कोयत्याशी; मुले शिक्षणापासून वंचित

रवींद्र येसादे -- उत्तूर--दुष्काळानं होरपळून गेलेल्या विदर्भ, मराठवाडा येथील ऊस मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आॅक्टोबर महिन्यापासून आले आहेत. आपल्या गावात चारा नाही, पाणी नाही, ऊसतोडच आमच्या जगण्याचा आधार बनल्याची व्यथा ऊसतोड कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.उत्तूर, चिमणे, झुलपेवाडी, धामणे या परिसरात विदर्भ, मराठवाड्यातील ऊस मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. यावर्षी पावसाचे अपुरे प्रमाण यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हिरवाई पाहून आनंद होतो, तो केवळ कारखाने सुरू असेपर्यंतच. गावाकडे जाताना इथल्या मातीला विसरून गावाकडे सुन्न मनाने जावे लागते.केवळ घर उघडे असावे म्हणून वृद्ध तेवढेच गावात आहेत. बाकीचे लहान मुले, महिला तरुण वर्गाच्या हातात ‘कोयताच’ नशिबी आला आहे. ऊस तोडणीवेळी भटकंती असते तशीच ती लहान मुलांची असते. त्यामुळे शाळा शिकणं दुरापास्त होऊन बसलं आहे. नकळत सहा वर्षांचा चिमुरडा हातात कोयता घेतो, हे वास्तव आहे.टोळीवरच्या महिलांची अवस्था तर फार केविलवाणी आहे. गुजेरी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील टोळीतील महिला व्यथा मांडताना म्हणाल्या, स्त्रियांना पहाटे चार वाजता उठावे लागते. सहा वाजेपर्यंत जेवण आटोपून फडात जावे लागते.लेकरांना पहाटेची झोप मिळत नाही. सहा महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन जावे लागते. कधी झाडाच्या फांदीला पाळणा, तर कधी फडात, ट्रकच्या सावलीत निपचित पडावे लागते. रात्रीच्या वेळेस आईला सोडून बोचऱ्या थंडीत विव्हळत पडावे लागते. बिचाऱ्या बाळाला काही कळत नाही. माय मात्र डोकीवर मोळी घेत छकुल्याकडे पहात शेकोटीची बाळाला ऊब देत पावलं टाकीत असते. रात्रीत ऊस भरण्यासाठी वाहन केव्हा येईल याची खात्री नसते. या साऱ्या त्रासाचा सामना करावा लागतो. पहाट कधी होईल याकडेच लक्ष द्यावे लागते. ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा सामना करावा लागतो.शिक्षण अपूर्णचजून ते आॅक्टोबरपर्यंतच मुलं शाळेत जातात. त्यानंतर मुल आई-वडिलांसमवेत फडामध्ये येतात. वारंवार कारखान्याकडून होणाऱ्या बदल्या, टोळीचे ठिकाण, कामाचे ठिकाण यामुळे मुलांच्या शाळेचा मेळ बसत नाही. त्यामुळे या मुलांचे शिक्षण अपुरेच राहते.पाच रुपयास एक घागर लातूर परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्यासाठी पाचरुपयास एक घागर पाणी मिळते. तुमच्याकडे पाणी, चारा मुबलक आहे. आमच्याकडे ऊस तोडून जनावरांना घालावा लागतो, अशी केविलवाणी प्रतिक्रिया महिला व्यक्त करतात.