शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

मानोली येथील झेंडा पॉर्इंट भूमापनाचा दस्तऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:37 AM

आर. एस. लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : आंबा-विशाळगड जंगलाच्या माथ्यावरील मानोली सडा व तेथील झेंडा पॉर्इंट एक रमणीय स्थळ म्हणून येथे पर्यटक पसंती देत आहेत. पण हा झेंडा पॉर्इंट जिल्ह्याच्या भूमापनाचा प्रारंभ बिंदू असल्याचे शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी सांगितले. याठिकाणी दरवर्षी २५ डिसेंबरला महसूल विभाग पांढरा ध्वज फडकवत आहे.कोल्हापूर ...

आर. एस. लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : आंबा-विशाळगड जंगलाच्या माथ्यावरील मानोली सडा व तेथील झेंडा पॉर्इंट एक रमणीय स्थळ म्हणून येथे पर्यटक पसंती देत आहेत. पण हा झेंडा पॉर्इंट जिल्ह्याच्या भूमापनाचा प्रारंभ बिंदू असल्याचे शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी सांगितले. याठिकाणी दरवर्षी २५ डिसेंबरला महसूल विभाग पांढरा ध्वज फडकवत आहे.कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याची सीमारेषा या झेंडा पॉर्इंटपासून सुरू होते. सह्याद्रीच्या माथ्यावरील कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सातारा व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सर्वांत उंच असे ठिकाण असून, येथून या पाच जिल्ह्यांच्या सीमा दिसतात. समुद्रकिनाºयानंतर पुढे सह्याद्रीच्या माथ्यावरील हे उंच ठिकाण म्हणून या सड्याला मोठे महत्त्व असल्याचे नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी सांगितले. म्हणूनच वर्षाच्या अखेरीस येथे महसूल विभागामार्फत पांढºया रंगाच्या कापडाचा झेंडा फडकवून या ठिकाणची ओळख वर्षानुवर्षे जपली जात आहे. ब्रिटीश काळात हे पठार कोकण व घाट प्रदेशाच्या अभ्यासाचे व सर्वेक्षणाचे होते. धोपेश्वर, पावनखिंड व विशाळगड या मध्यवर्ती भागातील हे उंच पठार शिवरायांच्या स्वराज्यात टेहळणीचे ठिकाण बनले होते. तीन किलोमीटरवर धोपेश्वर हे पांडवकालीन मंदिर आहे. पूर्वी येथे कळकवाडी गाव वसले होते.या कड्यालगत दरीत अस्वलांचा वावर होता. यावरून याला अस्वलाचा कडा असेही संबोेधतात. येथून एक किलोमीटरवर वाणीझरा नावाचा जिवंत बारमाही पाणवठा खळाळतो. झेंडा पॉर्इंटपुढे धोपेश्वर हद्दीत बॉक्साईटचे उत्खनन होत आहे. वनविभाग याच पठारावरून पदभ्रमंती मार्ग विकसित करीत आहे. सभोवतालचा ऐेतिहासिक व जैविक संपन्नतेचा परिसर जागतिक वारसा स्थळाचा मान घेऊन आहे. शिवाय इको झोनचा पट्टा म्हणून वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. दरवर्षी येथे महसूल विभागाच्या वतीने पांढºया कापडाचा झेंडा उभारतात. या ठिकाणची ओळख भक्कम ठेवण्यास या पॉर्इंटचे पक्के बांधकाम करून कापडाऐवजी टिकावू निशाण उभारण्याची गरज आहे.झेंडा पार्इंट बनला सेल्फी पॉर्इंट..मानोली सडा ते धोपेश्वर असा सुमारे पाचशे एकर क्षेत्राचा भव्य पठार आहे. श्रावणात हा पठार विविध रानफुलांनी बहरतो. घनघोर पाऊस अनुभवयाचा तर येथेच. विविध प्राण्यांचा वावर ही येथील वैशिष्ट्ये. दुर्मीळ मलबार पिट वायपर हा दुर्मीळ विषारी सर्प या पॉर्इंटकडे जाणाºया पायवाटेवरदिसतो. भिवतळी ते झेंडा पॉर्इंट हा चार किलोमीटरचा जंगलातील चढणीचा मार्ग. भव्य अशा दरीकडचा हा झेंडा पॉर्इंट तरूणाईचा सेल्पी पॉर्इंट बनला आहे. पूर्वेकडचे भव्य पठार तर पश्चिमेकडे दूरवर उतारावर विसावलेली कोकण भूमी दक्षिणेला विशाळगड, तर उत्तरेला आंब्याचे विलोभनीय घाटमाथे निसर्गप्रेमींना नेहमीच हाकारत आहेत. निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी येथील निसर्गाचा आनंद लुटताना येथील परिसराचे महत्त्व जपण्याची गरजही आहे.