Flag hoisting by a third party in Kolhapur | कोल्हापुरात तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगरातील आधार फाउंडेशनच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तृतीयपंथी, सामाजिक कार्यकर्त्या अंकिता आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापुरात तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण सुधाकर जोशी नगरातील आधार फाउंडेशनतर्फे तृतीयपंथींचा सन्मान

कोल्हापूर : कोणताही सोहळा असला की त्यास नामवंत पाहुणेच पाहिजेत असाच सर्वसामान्य माणसाचा आग्रह असतो. त्यातही राजकारणी, धनाढ्य व्यक्ती असली की त्याची चर्चाही होते अन‌् संयोजकांना मदतही मिळते. परंतु या विचाराला तसेच अपेक्षांना बगल देत कोल्हापुरातील सुधाकर जोशी नगर परिसरात आधार फाउंडेशनतर्फे सोमवारी भारतीय प्रजासत्ताक दिनी तृतीयपंथीच्या हस्ते ध्वजारोहण करुन एका दुर्लक्षित समुदायाचा सन्मान केला.

ढोल ताशा गजरात पाहुण्याचे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले तृतीयपंथी, सामाजिक कार्यकर्त्या अंकिता आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी महापालिका अधिकारी उत्तमराव इनामदार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेवटी तृतीयपंथी राखी पाटील यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले.

फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गुदगे यांनी स्वागत केले. प्रशांत वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पट्टन, किरण कळीमनी, अजित यतनाळ, शिवाजी शेटे फाउंडेशनचे सदस्य राहुल कांबळे, अक्षय वाघमारे, उमेश सुतार, अक्षय तुदीगाल, यल्लाप्पा कोडलीकर, चंद्राप्पा खाने, चंद्रकांत तुदीगाल यांनी प्रयत्न केले.

 

Web Title: Flag hoisting by a third party in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.