शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

सातेरी-महादेव डोंगर परिसर : पाण्यासाठी तलावांच्या उभारणीची गरज, कोरडवाहू जमिनीला कायमस्वरूपी पाणी हवे

शिवराज लोंढे -सावरवाडी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेचा उडालेला बोजवारा... ना पाझर तलावांची उभारणी, ना पाणी योजनेचे प्रकल्प.... नैसर्गिक पाण्याचे स्रोत असूनही केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे सातेरी-महादेव (ता. करवीर) या ऐतिहासिक डोंगर भागातील गेली ६६ वर्षे पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित राहिलेली आहे. पाण्याची सोय अजूनही उपलब्ध झाली नसल्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता घटली गेली.परिसरातील २० गावांचा समावेश असलेल्या परिसरात भौगोलिक दृष्टिकोनातून पाच हजार एकर पडीक जमिनीला कायमस्वरूपी पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादन क्षमता घटली आहे.डोंगर भागातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. या परिसरात प्रामुख्याने पावसाळ्यात नाचणी, वरी, ज्वारी, भुईमूग, तूर, भात यासारखी पिके वर्षानुवर्षे घेतली जातात. शेतीला बारमाही पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास खुंटला आहे.सातेरी-महादेव डोंगरी भागाला शासनाने तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ही पावसावर अवलंबून आहे. दऱ्या-खोऱ्याचा भाग असलेल्या या भागात पाझर तलावांची उभारणी झालेली नसल्यामुळे पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न भंगले आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी, शिरोली दुमाला ते केकतवाडी, गणेशवाडी ते केकतवाडी, नरगेवाडी ते शिरोली, बेरकळवाडी ते सडोली, आदी गावांच्यामध्ये मोठमोठ्या दऱ्या आहेत; पण केंद्र व राज्य शासनाने या परिसरात पाझर तलाव उभारणीकडे दुर्लक्ष केले आहे. सातेरी-महादेव डोंगर भागात तलावांच्या उभारणीची खरी गरज आहे. डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी शेती पाण्याखाली आणण्यासाठी लढ्यात उतरले पाहिजे. पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणली, तर डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. पाण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य व उद्योगपती