शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 12:09 IST

शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते.

ठळक मुद्देशिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यूतिघेजण अत्यवस्थ, १९ जखमी

कोल्हापूर/शिरोली : पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या टॅम्पोला दहाचाकी कॅन्टरने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागाव गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे वृत्त समोर आले आहे.  यातील तीन जण अत्यवस्थ अवस्थेत असून सुमारे 19  जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजता पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर येथे घडला. पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणल्यानंतर या पाचहीजणांवर काळाने झडप घातली. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी टॅम्पो केला होता. टॅम्पोमध्ये सुमारे ३८ विद्यार्थी होते. सांगलीला परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पुलावरच टॅम्पो कलंडला. त्याखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.  अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं. 

प्रविण शांताराम तिरलोटकर ((वय २३, रा.टाटा कॉलनी, चेंबूर मुंबई), सुशांत विजय पाटील(वय २२), केतन प्रदीप खोचे (वय २१, दोघे रा. तासगांव, सांगली), अरूण अंबादास बोंडे ((वय २२, रा. रामगाव बुलढाणा), सुमित संजय कुलकर्णी (वय २३, पिरळे , शाहुवाडी) हे पाच तरुण ठार झाले तर मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ आणि तन्मय वडगावकर, हे तिघेजण अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सांगली येथील वालचंद महाविद्यालयातील ४१ विद्यार्थी शिवज्योत आणण्यासाठी रविवारी टॅम्पोमधून गेले होते. रात्री पन्हाळगड येथे ते पोहोचले. पहाटे अडीच वाजता पन्हाळगडावरील शिवमंदिरातून ज्योत घेऊन ते सर्वजण बाहेर पडले. कोडोली-वाठार मार्गे ते महामार्गावरून येत होते. यातील एकजण शिवज्योत घेऊन रस्त्यावरुन धावत होता, तर टॅम्पोमध्ये सुमारे ३८ जण बसले होते. त्यांच्यातील चौघेजण दुचाकीवर बसले होते.

पहाटे साडेचार वाजता शिरोली एमआयडीसी येथील पहिला फाटा , आंबेडकर नगर येथे ते सर्वजण आले असता एका दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे चौघेजण थांबून दुसऱ्या दुचाकीतील पेट्रोल काढत होते. यावेळी मागून आलेला टेम्पोही थांबला. याचवेळी या थांबलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. थांबलेला टेम्पोही उलटला. हा अपघात इतका भयंकर होता की यामधील तीन तरुण जागीच ठार झाले. त्यांचा मेंदू रस्त्यावर पडलेला होता. या अपघातात एकूण पाचजण ठार झाले आहेत.या अपघातात गंभीर जखमी झालेले मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ, तन्मय वडगावकर हे तिघेजण अत्यवस्थ असून प्रणव देशमाने, निलेश तुकाराम बारंगे, धर्मेंद्र पाटील, आदीत्य कोळी, साजीत कनगो, अविनाश रावळ, सुभाष सखर, हर्ष सुभाष इंगळे, प्रणव मुळे, नदीम शेख, संगा शेरपा, रविंद्र नरूटे, शिवकुमार शिराटे, यश रजपुत, ऋषिकेश चव्हाण, गुंडु पटेकरी, प्रतिक सपकाळ, प्रितम सावंत, राहुल शशिकांत सुतार असे एकूण १९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शिरोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मृत सुशांत विजय पाटील 

टॅग्स :AccidentअपघातShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूरSangliसांगली