शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हवालाची रोकड लुटीप्रकरणी पाचजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 5:52 PM

कोल्हापूर येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे दोन किलो सोने, ६७ लाखांची रोकड व एक महागडी कार असा एक कोटी १८ लाख रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटणाऱ्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाखांची रोकड, ३० लाखांची सोन्याची बिस्कीटे, कार व दुचाकी असा सुमारे ६७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटमध्ये आणखी साथीदारांचा समावेश असून, पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे३२ लाख रोकड, ३० लाख किमतीची सोन्याची बिस्कीटेकार व दुचाकीसह ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे दोन किलो सोने, ६७ लाखांची रोकड व एक महागडी कार असा एक कोटी १८ लाख रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटणाऱ्या पाचजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाखांची रोकड, ३० लाखांची सोन्याची बिस्कीटे, कार व दुचाकी असा सुमारे ६७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटमध्ये आणखी साथीदारांचा समावेश असून, पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.संशयित आरोपी मुख्य सूत्रधार लक्ष्मण अंकुश पवार (वय २६, रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (२६, रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (२६, रा. शिवाजी चौक, हातकणंगले), अक्षय लक्ष्मण मोहिते (२६, र. आंबेडकर नगर, हातकणंगले), इंद्रजित बापु देसाई (२४, रा. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अहवालातील रोकड व दागिने मुंबईहून कोल्हापुरात येणार आहेत, याची टिप कोणी दिली. रेकी कोणी केली. यासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू असून, लवकरच आणखी काही महत्त्वाचे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे.राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेंद्रनगर येथील एका हॉटेलपाठीमागे ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ कार्यालयाजवळ कारच्या (के. ए. ४८ एन. ००६७) समोर दरोडेखोरांनी दुसरी कार आडवी लावून चिंतामणी पवार, सुशांत कदम, सागर सुतार यांचे अपहरण करून त्यांच्या कारमधील हवालाची रोकड, दागिने असा सुमारे एक कोटी १८ लाख १२ हजार किमतीचा मुद्देमाल लुटला होता.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दोन कार एकामागून जाताना दिसून आल्या. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्या रत्नागिरीच्या दिशेने जाताना दिसून आल्या. पोलिसांनी तपास केला असता, संशयित लक्ष्मण पवार याने त्याचा मेव्हणा गुंडाप्पा नंदिवाले, अविनाश मोटे, अक्षय मोहिते, इंद्रजित देसाई यांच्यासह अन्य साथीदारांना हाताशी धरून लुटमार केली आहे; त्यासाठी स्वत:ची कार वापरली असल्याचे निष्पन्न झाले.

सोमवारी संशयित पवार मेव्हणा नंदीवाले याच्याकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घराच्या आसपास पोलिसांनी सापळा लावला. कार (एम. एच. १२ एफ. वाय. ४५६९) नंदीवाले याच्या घरासमोर उभी होती. त्यामध्ये तिघेजण बसले होते. त्यांच्यासह कारची झडती घेतली असता, पवार याच्याकडे सात लाख, नंदीवालेकडे नऊ लाख रोकड व १५ लाखांची अर्धा किलोची सोन्याची बिस्कीटे, मोटे याच्याकडे आठ लाख व अर्धा किलो सोने अशी सुमारे ३२ लाखांची रोकड, ३० लाखांचे एक किलो सोने सापडले.चौकशीमध्ये त्यांची गुन्ह्यांची कबुली देत वृत्तपत्रात आलेल्या बातमीची चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आणखी दोन साथीदार येणार असल्याचे सांगितले. काही वेळातच मोहिते व देसाई मोटारसायकलवरून आले. त्यांचा पोलिसांनी ताबा घेतला. दोघांच्या खिशामध्ये प्रत्येकी चार असे आठ लाख रुपये मिळून आले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर