कोल्हापूरच्या पाचजणांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:37 IST2025-06-07T12:33:50+5:302025-06-07T12:37:19+5:30

कोल्हापूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी ...

Five people from Kolhapur selected for Samaj Bhushan Award | कोल्हापूरच्या पाचजणांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

कोल्हापूरच्या पाचजणांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

कोल्हापूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी कोल्हापुरातील पाचजणांची निवड झाली आहे. शुक्रवारी ही नावे जाहीर करण्यात आली.

दगडू श्रीपती माने - शिरोळ, लालासो आबाजी पोवार - पुनाळ, ता. पन्हाळा, विठ्ठल जोती कदम- श्री कॉलनी गारगोटी, नामदेव दादू कांबळे - शिवाजीनगर, गारगोटी व साताप्पा पुंडलिक कांबळे - बस्तवडे, ता. कागल यांचा समाजभूषण पुरस्कार मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. हे पुरस्कार २०२३-२०२४ सालासाठीचे असून ६० व्यक्ती आणि १० संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, त्यांच्या कामाची दखल घ्यावी, त्यांच्या कामापासून इतरांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा पुरस्कार दिला जातो.

Web Title: Five people from Kolhapur selected for Samaj Bhushan Award