खुनातील पाच कुख्यात आरोपींना बेड्या, पुणे-बेंगलोर महामार्गावर थरार

By जमीर काझी | Updated: September 8, 2022 21:13 IST2022-09-08T21:12:56+5:302022-09-08T21:13:18+5:30

कागल पोलीसांनी धाडशी कारवाई करीत आरोपींना पकडले.

Five notorious accused in the murder are arrested on Pune-Bangalore highway | खुनातील पाच कुख्यात आरोपींना बेड्या, पुणे-बेंगलोर महामार्गावर थरार

खुनातील पाच कुख्यात आरोपींना बेड्या, पुणे-बेंगलोर महामार्गावर थरार

कागल( जहाॅगीर शेख ) : राजस्थान मधील भरतपुर येथे जमीन वादातुन गोळ्या झाडून एकाचा खुन करून महाराष्ट्र मार्गे गोव्याला पळुन जात असलेल्या एका कुविख्यात टोळीतील पाच जणांना आज कागल पोलीसांनी धाडशी कारवाई करीत पकडले. दुपारी साडेचारच्या दरम्यान येथील कर्नाटक हद्दीतील कोगनोळी टोल नाक्याजवळ पाचच मिनटात ही कारवाई पुर्ण केली. या आरोपींना कोल्हापुर गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. वीसहुन अधिक हत्यारबंद पोलीस पुणे बेंगलोर महामार्गावर येऊन वाहने थांबवु लागल्याने नागरीकांचीही गर्दी झाली होती.

आरोपी महाराष्ट्रातुन गोव्याला जात असल्याची माहीती कोल्हापुर पोलीसांना मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे संजय गोरले यांनी पेठवडगाव, कागल व आजरा पोलीसांना माहीती दिली. तो पर्यंत संशयीत आरोपी कीणी  टोलनाका पार करून पुढे आले होते. ते कोगनोळी टोल नाक्यावर येण्यापुर्वी वेगवान हालचाली करीत कागल पोलीस तेथे पोहचुन गुन्हेगारांची वाट पाहत थांबले. वाहतुकही रोखली.  आरोपींच्या वाहनास घेराव घालुन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडुन प्रतिकार होण्याची शक्यता होती. त्यामुळे सावधपणा व धाडस दाखवीत कागल पोलीसांनी ही कारवाई केली. 

Web Title: Five notorious accused in the murder are arrested on Pune-Bangalore highway