शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लक्ष्मीपुरीत बेसमेंटमधील गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग, लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:50 IST

अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आणि जवानांनी आग विझवली

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील भूपाल टॉवरच्या बेसमेंटला असलेल्या गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. गुरुवारी (दि. २५) दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीत रिकाम्या बाटल्या, बॉक्सचे पुठ्ठे आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. ताराराणी चौक आणि महापालिका येथील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आणि जवानांनी आग विझवली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भूपाल टॉवरमध्ये असलेल्या एका हॉटेलचे गोडाऊन इमारतीच्या बेसमेंटला आहे. या गोडाऊनमध्ये रिकाम्या बाटल्या आणि बॉक्सचे पुठ्ठे ठेवले होते. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास गोडाऊनच्या झरोख्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच शेजारचे चहा टपरीवाले पांडुरंग चव्हाण आणि परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास वर्दी दिली. आठ ते दहा मिनिटांत ताराराणी चौक आणि महापालिकेतील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या. गोडाऊनला कुलूप असल्याने जवानांनी सुरुवातीला गोडाऊनच्या झरोख्यातून पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग जास्तच धुमसत असल्याने गोडाऊनचे कुलूप तोडून आग विझवली. सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. बघ्यांची गर्दी आणि प्रवाशांच्या वाहनांमुळे प्रमुख मार्गावर वाहनांची कोंडी झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Basement godown fire in Laxmipuri causes significant loss.

Web Summary : A fire broke out in a Laxmipuri basement godown due to a short circuit, causing ₹1 lakh in damages. Firefighters extinguished the blaze, which consumed bottles and electrical equipment. Traffic was disrupted.