शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हुपरीला नगरपालिका

By admin | Updated: July 31, 2015 01:20 IST

मुख्यमंत्र्यांची मंजुरी : कृती समितीच्या लढ्यास यश

हुपरी : कृती समितीच्या लढ्याची दखल घेऊन हुपरी येथे नगरपालिका स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांनी मुंबईहून दूरध्वनीद्वारे सांगितले. यावेळी आमदार सुजित मिणचेकर व आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते. जनआंदोलनाद्वारे नगरपालिका मंजूर करून घेण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. नगरपालिका मंजुरीची माहिती मिळाल्यानंतर हुपरीत जल्लोष करण्यात आला. चंदेरीनगरी म्हणून संपूर्ण देशात हुपरी प्रसिद्ध आहे. ६0 हजार लोकसंख्येच्या या गावाला ग्रामपंचायतीला नागरी सुविधा देण्यात अपयश आले आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून हुपरी नगरपालिकेची मागणी शासन दरबारी सुरू आहे. मात्र, मागणीसाठी गावातील सर्व पक्ष व संघटनांबरोबर युवकांनी कृती समितीच्या माध्यमातून लोकचळवळ उभी केली. यासाठी लक्षणीय उपोषण, सह्यांची मोहीम याद्वारे तीव्र लढा उभारण्यात आला. तबल १५ दिवस उपोषण व तीन दिवस बेमुदत उपोषणाद्वारे शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर कृती समितीने शासन दरबारीही प्रयत्न केले. ...आणि मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर यांनी बैठकीचे आयोजन केले. निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, ‘भाजप’चे सुदर्शन खाडे, बाळासो रणदिवे, ‘शिवसेने’चे रघुनाथ नलवडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे यांचे शिष्टमंडळ बैठकीस उपस्थित होते. आमदार हाळवणकर व आमदार मिणचेकर हे कार्यक्षम आमदार असून, त्याचा पाठपुरावा व कृती समितीचा लढा यामुळे हुपरी नगरपालिकेस मंजुरी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून प्रस्तावावर स्वाक्षरी करीत हुपरीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. त्यानंतर हुपरी नगरपालिका मंजुरीची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हुपरीत एकच जल्लोष सुरू झाला. गेल्या तीन दिवसांपासून अशोक खाडे, अमोल देशपांडे, विनोद खोत, उदय शिंदे, महादेवराव पाटील, पृथ्वीराज गायकवाड, आनंदराव कांबळे, मुबारक शेख, डॉ. सुभाष मघाळे, शहाबुद्दीन घुडुबाई, सुनील कोरे, बाबासो गायकवाड, प्रवीण कुंभोजकर, मनोज पाटील, वसंत कांबळे, वसंत वराळे, प्रकाश माळी, जीवन नवले, सौ. सुखसारे, विलास चव्हाण, आदी उपोषणास बसले होते. हुपरीकरांंचे नगरपालिकेचे स्वप्न युती शासनाने सत्यात उतरल्याने कृती समितीने शासनाचे आभार मानले. हुपरीतील सर्वपक्षीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी व विविध मंडळे, संघटना यांनी या जनआंदोलनात सहभाग घेतला.