शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा २१ ऑक्टोबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:54 IST

Shivaji University, kolhapurnews, educationsector, Student, exam चक्रीवादळाची शक्यता असल्याने या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून विद्यापीठाने शनिवार, सोमवार आणि मंगळवारच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे या लेखी परीक्षांचा प्रारंभ आता दि. २१ ऑक्टोबरपासून होणार आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाची शक्यता असल्याने शिवाजी विद्यापीठाचा निर्णय तीन विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोल्हापूर : विविध विद्याशाखेच्या अंतिम सत्र, वर्षातील लेखी परीक्षा शनिवार (दि. १७) पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्याचे नियोजन शिवाजी विद्यापीठाने केले होते. मात्र, राज्यातील अतिवृष्टीमुळे चक्रीवादळाची शक्यता असल्याने या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून विद्यापीठाने शनिवार, सोमवार आणि मंगळवारच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे या लेखी परीक्षांचा प्रारंभ आता दि. २१ ऑक्टोबरपासून होणार आहे.

विद्यापीठाने अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षा दि. १० ऑक्टोबरपासून घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात विविध मागण्यांसाठी विद्यापीठ सेवकांचे लेखणीबंद आंदोलन केल्याने या परीक्षेची तयारी ठप्प झाली. यासह ऑनलाईन परीक्षेसाठीची एजन्सी नियुक्त झाली नसल्याने विद्यापीठाने या परीक्षा दि. १७ ऑक्टोबरपासून घेण्याचा निर्णय घेऊन तयारी सुरू केली. त्यातच आता राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी आणि चक्रीवादळाची शक्यता असल्याने ऑनलाईन परीक्षा घेण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या परीक्षा दि. २१ ऑक्टोबरपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, त्यांच्या सुधारित तारखा ऑनलाईन परीक्षा विभागाकडून जाहीर केल्या जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरूऑनलाईन परीक्षेचे विद्यार्थ्यांना स्वरूप माहीत व्हावे, यासाठी सराव परीक्षा (मॉक टेस्ट) गुरुवारपासून सुरू झाली. या सराव परीक्षेच्या लिंकची माहिती देणारे एसएमएस आतापर्यंत सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सायंकाळनंतर परीक्षेचा सराव केला. ऑनलाईन परीक्षेच्या प्रणालीची शिक्षकांना माहिती देण्यासाठीचे प्रात्यक्षिक आज, शुक्रवारी होणार आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीexamपरीक्षा