शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज कारखान्याच्या चौकशीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 26, 2015 00:47 IST

‘स्वाभिमानी’चा पाठपुरावा : अपिलाला केराची टोेपली

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८८ प्रमाणे चौकशी करून आर्थिक नुकसानीच्या जबाबदारी निश्चितीचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, याबाबत कारखान्याने सहकारमंत्र्यांकडे अपील करून स्थगिती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण स्थगितीबाबत कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने चौकशी कामकाज सुरू करीत असल्याचे पत्र चौकशी अधिकारी आर. बी. वाघ यांनी कारखान्याला पाठविले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.कारखान्याची यापूर्वीच सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ नुसारची चौकशी पूर्ण होऊन २१ मार्च २०१४ रोजी अहवाल संबंधित कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर २ मे २०१५ रोजी कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चितीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिले. त्यामध्ये सवलतीची साखर, अतिरिक्त कर्मचारी, अवास्तव खर्च, रोजंदारी कर्मचारी खर्च, अशा मुद्द्यांचा समावेश होता. पण, त्यानंतर लगेचच १० जुलै २०१५ रोजी सुधारित आदेश देताना त्यामध्ये परिशिष्ट ‘ब’चा समावेश केला. कारखाना प्रशासनाने यावर सहकार मंत्रालयाकडे धाव घेत स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)परिशिष्ट ‘ब’मधील मुद्दे४कार्यालयीन कामासाठी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अ‍ॅडव्हान्सची रक्कम १९ लाख ८२ हजार. त्यापैकी सेवेत नसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चार लाख ९९ हजार येणे आहे. या अ‍ॅडव्हान्सचा जमाखर्च एक महिन्यात होणे गरजेचे असताना १९९१ पासून ही रक्कम थकीत आहे.४स्टेट बँक आॅफ इंडियाच्या गडहिंग्लज शाखेकडून कारखान्याने तोडणी वाहतुकीसाठी आठ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी एक कोटी ५३ लाख रुपये संबंधितांना वाटून उर्वरित रक्कम अन्यत्र वापरली. त्यामुळे मंजूर कर्जाचा गैरविनियोग झाला असून, १०० टक्के परतफेडीची हमी कारखान्याने दिल्याने त्याची जबाबदारी संचालकांवर आहे.४युनियन बँकेकडूनही तीन कोटी रुपयांचे बेसल डोस कर्ज ऊस उत्पादक सभासदांना पूर्व मशागत, बी-बियाणे, खते यासाठी वाटप करणे आवश्यक असताना ही रक्कमही अन्यत्र वापरली आहे.४सन २०११-१२ मध्ये ‘एफआरपी’पेक्षा ६२४ रुपये प्रतिटन दर जास्त दिल्याने १४ कोटी ३९ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. याचीही जबाबदारी संचालकांवर आली आहे. 

कारखान्याच्या या आर्थिक अरिष्टाला गलथान कारभार करणारे संचालक मंडळच जबाबदार असल्याने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून रकमेची वसुली करावी. शिवाय शासकीय लेखापरीक्षकांनी सुद्धा गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करून केवळ दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारत राहिल्याने सर्वच सहकारी संस्थांची ही अवस्था झाली आहे. - राजेंद्र गड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना