भामटेत देसाई विरुद्ध पाटील गटात लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:30+5:302021-01-13T05:00:30+5:30
कोपार्डे : भामटे (ता. करवीर) येथे अनेक वर्षांनंतर देसाई गट एकत्र आल्याने पाटील गटाला आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या ...

भामटेत देसाई विरुद्ध पाटील गटात लढत
कोपार्डे : भामटे (ता. करवीर) येथे अनेक वर्षांनंतर देसाई गट एकत्र आल्याने पाटील गटाला आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या निवडणुकीत देसाई गटाच्या फुटीचा फायदा पाटील गटाला झाल्याने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळाले होते.
भामटेत देसाई व पाटील गटांत पारंपरिक लढत होत होती. गेल्या वेळी देसाई गटात पडलेल्या फुटीचा फायदा पाटील गटाला झाला होता. यावर्षी देसाई गटाच्या तरुणांनी नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करीत पाटील गटाकडून ग्रामपंचायत बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला होता; पण देसाई गटासह इतर सर्व गट देसाई गटाबरोबर राहणार असल्याचे घोषित केल्याने तरुणांना पाटील गटाचा प्रस्ताव फेटाळला. येथे देसाई गटाच्या देसाई बहुजन ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व विलास देसाई, शिवाजी देसाई, नामदेव देसाई, सुधाकर देसाई, भरत मगदूम, भगवान देसाई, उत्तम देसाई हे करीत आहेत; तर पाटील यांच्या ज्योतिर्लिंग विकास आघाडी बाजीराव पाटील, पी. एस. पाटील, सूरशेन पाटील करीत आहेत. येथे देसाई गट एकत्र आल्याने निवडणुकीचे चित्र वेगळे दिसत आहे.
एकूण मतदान - १८३०, प्रभाग - ३
सदस्य - ९