शौचालयाच्या मालकीवरून दोन कुटुंबांत मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 17:18 IST2020-05-19T17:17:37+5:302020-05-19T17:18:21+5:30

शिवाजी पेठेतील बुवा चौक येथे शौचालयाच्या मालकीच्या वादातून एकमेकांशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये सोमवारी (दि. १८) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी राजेंद्र सदाशिव निकम (वय ५८, रा. बुवा चौक, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Fight between two families over ownership of the toilet | शौचालयाच्या मालकीवरून दोन कुटुंबांत मारामारी

शौचालयाच्या मालकीवरून दोन कुटुंबांत मारामारी

ठळक मुद्देशौचालयाच्या मालकीवरून दोन कुटुंबांत मारामारीशौचालयाच्या मालकीवरून दोन्ही कुटुंबांत वाद

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील बुवा चौक येथे शौचालयाच्या मालकीच्या वादातून एकमेकांशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये सोमवारी (दि. १८) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी राजेंद्र सदाशिव निकम (वय ५८, रा. बुवा चौक, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निकम यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विश्वनाथ सर्जेराव पाटील (५५), आशितोष विश्वनाथ पाटील (२७), संपदा विश्वनाथ पाटील (४५) आणि अभिषेक विश्वनाथ पाटील (२२) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. निकम आणि पाटील कुटुंबीय एकाच गल्लीत एकमेकांच्या शेजारी राहतात. शौचालयाच्या मालकीवरून दोन्ही कुटुंबांत वाद आहे.

सोमवारी सकाळी राजेंद्र निकम हे शौचालयाची खराब झालेली कौले बदलण्याचे काम मजुरांकडून करवून घेत होते. यावेळी विश्वनाथ पाटील यांनी मजुरांना काम थांबविण्यास सांगितले. काम का थांबवले याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या राजेंद्र निकम यांना विश्वनाथ पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाथाबुक्क्या आणि स्टीलच्या पाइपने बेदम मारहाण केली.

भांडण सोडविण्यासाठी आलेल्या निकम यांच्या चुलतीला पाटील कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. याबाबत जुना राजवाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Fight between two families over ownership of the toilet