रेल्वे मार्गावर फेस्टिव्हल स्पेशल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:07+5:302020-12-24T04:22:07+5:30
श्रमदानाने खाेदली विहीर रत्नागिरी : लॉकडाऊन काळात सारे व्यवहार ठप्प झालेले असताना, संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गावातील काही मोजक्या ग्रामस्थांनी ...

रेल्वे मार्गावर फेस्टिव्हल स्पेशल
श्रमदानाने खाेदली विहीर
रत्नागिरी : लॉकडाऊन काळात सारे व्यवहार ठप्प झालेले असताना, संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गावातील काही मोजक्या ग्रामस्थांनी आपल्या वाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. या ग्रामस्थांनी श्रमदानातून केवळ २२ दिवसांत २७ फूट खाेल विहीर खोदली. या विहिरीत सद्य:स्थितीत १७ फूट पाणी आहे.
बांधकामांना अभय?
रत्नागिरी : शहरातील अतिक्रमणांविराेधात माेहीम हाती घेण्यात आल्यानंतर मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामांविराेधात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर नाेटीसही बजावण्यात आली. मात्र, नाेटिसीचा कालावधी उलटून गेला तरी अद्यापही ही बांधकामे तशीच असल्याने या बांधकामांना अधिकाऱ्यांनीच अभय दिल्याचे दिसत आहे.
बायोगॅस लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
कोल्हापूर : बायोगॅस बांधून वर्ष होत आले तरी जिल्ह्यातील ५२८ लाभार्थ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी २०१९-२० या वर्षासाठी १०७० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आले. या सर्व लाभार्थ्यांसाठी एक कोटी ३३ लाख ३० हजार रुपयांची गरज होती. मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ ६६ लाख ६५ हजार रुपये अनुदान आले, जे ५४२ लाभार्थ्यांच्या खात्यावर त्या महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात आले.
या सर्व लाभार्थ्यांसाठी एक कोटी ३३ लाख ३० हजार रुपयांची गरज होती. मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ ६६ लाख ६५ हजार रुपये अनुदान आले, जे ५४२ लाभार्थ्यांच्या खात्यावर त्या महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात आले.
पानमळ्यांमध्ये उतरणी सुरू
सांगली : मिरज पूर्व भागात पानमळ्यांच्या उतरणी सुरू झाल्या आहेत. इंग्रजी आठ अंकाप्रमाणे किंवा मराठील ‘ळ’ अक्षराप्रमाणे पानमळ्याच्या उतरणी केल्या जात आहेत. बुंध्याजवळ चर खोदून पानवेली त्यात गाडल्या जातात. सध्या बागायतदार उतरणीच्या कामात व्यस्त असून, यासाठी कुशल कामगारांची कमतरता भासत आहे.
सर्कल आणि तलाठी यांच्यात हाणामारी
सांगली : उरुण परिसरातील चावडीमध्ये असणारे सर्कल आणि तलाठी यांच्यात वाद उफाळला आहे. बुधवारी तर चक्क दोघे एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. त्याची तक्रारही सामाजिक कार्यकर्ते अंगराज पाटील यांनी आणि अंकुश जाधव यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडे केली तरीसुद्धा या चावडीत या दोघांमध्ये नेहमीच वादावादी होत असल्याने शासकीय कामांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
या दोघांच्या वादामुळे बहुतांश दिवस हे तलाठी महाशय कार्यालयाकडे फिरकतसुद्धा नाहीत. त्यामुळे सात-बारा नोंदी आदी कागदपत्रे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागतात, तर काही शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी दिसत नाहीत.
साताऱ्यात पारा १० अंशावर
सातारा : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून थंडी कायम असून साताऱ्यात बुधवारी १०.०१ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सातारकरांची हुडहुडी अजूनही जाता जाईना तर महाबळेश्वरातही थंडी कायम आहे. ग्रामीण भागात थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत. महाबळेश्वरमध्येही थंडीचा जोर कायम आहे. मागील काही दिवसांपासून महाबळेश्वरात आलेले पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहेत. महाबळेश्वरमध्ये मंगळवारी ११.०३ अंशांची नोंद झाली तर बुधवारी किमान तापमान १२ अंशांवर गेले होते.
..........................................................