कोल्हापूर: आजरा तहसिल कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:36 IST2022-08-29T16:32:40+5:302022-08-29T16:36:02+5:30

उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Female employee died of heart disease in Ajara Tehsil office Kolhapur district | कोल्हापूर: आजरा तहसिल कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर: आजरा तहसिल कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

सदाशिव मोरे

आजरा : आजरा तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून महिलेचा कार्यालयातच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. अंजना सर्जेराव पाटील (वय ५२ रा. बिरदेवनगर, सरकारी दवाखानाशेजारी निपाणी - कर्नाटक) असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

दोन दिवसांची सुट्टी संपवून तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अंजना पाटील या निपाणी येथून आज कामावरती आल्या होत्या. त्यांनी कामाला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना तहसिलदार विकास अहिर, निवडणूक नायब तहसिलदार डी.डी. कोळी यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

ही घटनेची माहिती सर्वत्र पसरताच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दुपारी अंजना पाटील यांचे नातेवाईक आजऱ्यात आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून असा परिवार आहे.

Web Title: Female employee died of heart disease in Ajara Tehsil office Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.