शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गॅसच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरात उद्योगांची चाके थांबण्याची भीती, उत्पादन प्रक्रियेवर परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:44 IST

फौंड्री, फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, मेटल कटिंग, वेल्डिंग, कोअर शाॅप तसेच शेती अवजारे तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅसचा वापर केला जातो

शिरोली : कोल्हापूरच्या उद्योगांसाठी एलपीजी गॅसचा तुटवडा सध्या ६० टक्केपेक्षा जास्त जाणवत आहे. पुढील चार दिवसांत तो ९० टक्क्यांवर जाण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तविली आहे. गॅसच उपलब्ध झाला नाही तर कोल्हापुरातल्या उद्योगांची चाके थांबतील, असे उद्योजकांनी सांगितले.केंद्र सरकारने उद्योगांमध्ये एलपीजी गॅसच्या वापरावर निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योग अडचणीत सापडले आहेत. या निर्णयाचा परिणाम केवळ उद्योगांवरच नाही, तर ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या उद्योगांवरही होऊ लागला असून, उत्पादन प्रक्रियेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.जिल्ह्यातील फौंड्री, फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, मेटल कटिंग, वेल्डिंग, कोअर शाॅप तसेच शेती अवजारे तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅसचा वापर केला जातो. या कामांसाठी ऑक्सिजन आणि एलपीजी गॅसचा एकत्रित वापर आवश्यक असतो. त्यामुळे एलपीजी गॅसची कमतरता आणि उपलब्ध होत नसल्याने उत्पादन प्रक्रिया अडचणीत आली आहे आणि त्याचा परिणाम ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीवरही होतो.

वाचा: अक्षता पडतील; पण पंगती कशा उठतील?, मेनू बदला अन्यथा मुहूर्त; गॅस टंचाईने लग्न समारंभावर टांगती तलवारकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ७० ते ८० टक्के उद्योगांमध्ये एलपीजी आणि ऑक्सिजनचा वापर केला जातो. दिवसाला १०० टनपेक्षा जास्त एलपीजी गॅस लागतो. विशेषतः लोखंडी साहित्य कापणे, वेल्डिंग करणे, मशिनरी दुरुस्ती, तसेच विविध प्रकारचे इंजिनिअरिंग घटक तयार करण्यासाठी या दोन्ही गॅसचा वापर अत्यावश्यक मानला जातो. मात्र, सध्या उद्योगांना एलपीजी गॅस मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादन कमी करावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

सध्या ६० टक्केपेक्षा जास्त तुटवडा जाणवत आहे. पुढील दोन-तीन दिवसात तो ८० ते ९० टक्क्यांवर जाईल आणि गॅस उपलब्ध झाला नाही तर मात्र उद्योग बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर येईल. - सुनील शेळके, अध्यक्ष, गोशिमा 

उद्योगांना एलपीजी गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेक उद्योगांमध्ये मेटल कटिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी ऑक्सिजन आणि एलपीजी गॅसचा एकत्रित वापर केला जातो. त्यामुळे एलपीजी नसल्यास ऑक्सिजनचा वापरही मर्यादित राहतो. परिणामी, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या उद्योगांनाही आर्थिक फटका बसत आहे.- राहुल गरगटे, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारएलपीजी गॅसच्या कमतरतेमुळे शासनाने रेशनिंग करण्याचे आणि घरगुती वापरासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक वापरावर त्याचा परिणाम होणार आहे. - वीरेंद्र पाटील, सीआयआय अध्यक्षजिल्ह्यातील बहुतांश शेती अवजारे, फॅब्रिकेशन आणि इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये ऑक्सिजन आणि एलपीजी गॅस हे उत्पादन प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या निर्बंधांमुळे उद्योगांना एलपीजी गॅस मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. - रणजीत जाधव, शेती अवजारे उद्योजक

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Shortage Threatens Kolhapur Industries, Impacting Production Processes

Web Summary : Kolhapur industries face LPG shortage exceeding 60%, potentially reaching 90%. This impacts foundries, fabrication, engineering, and oxygen cylinder suppliers, disrupting production, especially for metal cutting and welding. Businesses fear closures if the situation worsens.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणUSअमेरिकाIsraelइस्रायलWarयुद्धCylinderगॅस सिलेंडर