Fear of youth drowning after bathing | रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची भीती

रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची भीती

ठळक मुद्देरंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची भीतीअग्निशमन दल. पोलिस पथकाचा शोध सुरु

कोल्हापूर : रंगपंचमी खेळून झाल्यानंतर मित्रासोबत आंघोळीसाठी गेलेला तरुण येथील राजाराम तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.

रंगपंचमी साजरी केल्यानंतर मित्रासमवेत हा २३ वर्षीय तरुण सकाळी ९.३0 वाजण्याच्या सुमारास राजाराम तलावात पोहण्यासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. त्याच्या मित्राने तातडीने अग्निशमन दलाला बोलाविले.

अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरु केली आहे. परंतु अद्यापही त्याचा ठावठिकाणा सापडत नाही. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान राजाराम तलावात त्याचा शोध घेत आहेत. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fear of youth drowning after bathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.