शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीची धास्ती, अन्‌ वाहनांची गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST

कोल्हापूर : शहरात सकाळी व सायंकाळी चार तास कडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने धास्तावलेल्या वाहनधारकांनी रस्त्यावर येणेच कमी केले, ...

कोल्हापूर : शहरात सकाळी व सायंकाळी चार तास कडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने धास्तावलेल्या वाहनधारकांनी रस्त्यावर येणेच कमी केले, परिणामी गेल्या चार दिवसांपेक्षा शनिवारी रस्त्यावरील वाहनांची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे; पण दिवसभर ‘अत्यावश्यक’च्या नावाखाली काही वाहने रस्त्यावरून धावत होती. शहरात प्रवेशणाऱ्या मार्गावर पोलिसांनी तपासणी यंत्रणा कडक केली होती. दिवसभर शहरातील सर्व दुकाने बंद राहिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, शुक्रवारी शहरातील वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता त्याचा धसका सर्वसामान्यांनी घेतल्याचे दिसून आले. शहरात प्रवेशणाऱ्या सर्वच मार्गांवर पोलिसांच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत होती. सकाळी व सायंकाळी गर्दी होण्याच्या वेळेत रस्त्यावर नाहक फिरणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे विचारपूस केली जात होती. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नाहक फिरणाऱ्यांची वाहने थेट जप्तीची मोहीम पोलीस खात्याने हाती घेतली. त्याचा धसका घेऊन शहरात नाहक फिरणाऱ्यांची वाहने मंदावल्याचे चित्र दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानकांसह रंकाळा, संभाजीनगर बसस्थानक दिवसभर सुनासुना होता. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आता प्रत्येकाच्या तोंडाला मास्क दिसू लागले आहेत.

शासकीय सुटीचाही परिणाम

शनिवारी शासकीय सुटी असल्याने सरकारी कार्यालये बंद राहिली, सरकारी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरून नाहक फिरण्यापेक्षा घरीच थांबणे पसंद केल्याचे दिसून आले. परिणाम रस्त्यावरील वर्दळीवर दिसून आला.

नाकाबंदी व वाहने जप्तीची मोहीम

शहरात रंकाळा टॉवर, नवीन वाशी नाका, धैर्यप्रसाद चौक, शिवाजी पूल या ठिकाणी पोलीस कारवाई करीत वाहने जप्तीची कारवाई सुरू होती. या कारवाईत शनिवारीही दिवसभरात मोठ्या संख्येने वाहने जप्त केली. शिवाय दाभोळकर चौक, बिंदू चौक, सायबर चौक, दसरा चौक, ताराराणी चौक आदी ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहने तपासणी मोहीम होती घेतली होती.

दोन प्रहरात कडक कारवाई

शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी कडक करवाईचे शस्त्र उगारले आहे. त्यांनी मदतीसाठी महापालिकेकडून ८८ कर्मचारी घेतले आहेत. त्यांची दोन टप्प्यांत विभागणी करून कारवाई केली जात आहे. रखरखीत उन्हामुळे भर दुपारी रस्ते सुनसान झाले होते.

पूर्णपणे दुकाने बंद

शहरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि महापालिका व पोलिसांची संयुक्त कडक भूमिका यामुळे शहरातील बहुतांशी दुकाने शनिवारी बंद राहिली. त्याशिवाय भाजीमंडईमध्येही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेक भाजी विक्रेते रस्त्याकडेला सावली पाहून फळ, भाजी विकताना दिसत होते.

वाय.पी. पोवारनगर, उद्यमनगर बंद

शहरातील मिनी औद्योगिक वसाहत शिवाजी उद्यमनगर आणि वाय.पी. पोवारनगर या ठिकाणचे बहुतांशी कारखाने बंद राहिले. त्यामुळे या परिसरात बंदसदृश स्थिती होती.