kolhapur: बिद्री कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी फत्तेसिंग भोसले-पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:35 PM2023-12-29T16:35:36+5:302023-12-29T16:37:08+5:30

नेते मंडळींनी दिलेला शब्द पाळला

Fattesingh Bhosale Patil as the approved director of Bidri factory | kolhapur: बिद्री कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी फत्तेसिंग भोसले-पाटील 

kolhapur: बिद्री कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी फत्तेसिंग भोसले-पाटील 

दत्ता लोकरे

सरवडे: बिद्री (ता. कागल) येथील  दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी फत्तेसिंग रामसिंग भोसले पाटील यांची निवड करण्यात आली. कारखान्याच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते.

बिद्री साखर कारखान्याची सन २०२३ ते २८ या  कालावधीसाठी  नुकतीच  निवडणूक पार पडली. त्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के .पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने  सर्व २५ जागा जिंकून सत्ता कायम राखली. 

निवडणूक दरम्यान राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील फत्तेसिंग भोसले पाटील यांचे सताधारी आघाडीतून उमेदवारीसाठी नाव जाहीर केले आणि लगेचच उमेदवारीचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे समर्थकांची मोठी नाराजी व्यक्त केली. दरम्यानच्या कालावधीत त्यांना स्वीकृत करण्याचा शब्द नेते मंडळींनी दिला होता. अखेर आज संचालक मंडळाच्या बैठकीत फत्तेसिंग भोसले यांची स्वीकृत संचालकपदी निवड करून नेते मंडळींनी दिलेला शब्द पाळला अशी चर्चा निवडीच्या ठिकाणी होती.

निवड सभेस उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर.डी.देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले ,सर्व खाते प्रमुख उपस्थित होते .

Web Title: Fattesingh Bhosale Patil as the approved director of Bidri factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.