कोल्हापूर : संपूर्ण देशात कोल्हापूरचा अभिर विक्रांत गोखले हँडलीगमध्ये सर्वांत वेगवान खेळाडू ठरल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. अभिर हा विबग्योर हाय इंटरनॅशनल स्कूल आणि जिल्हा बास्केटबॉल संघटनेचा खेळाडू आहे.
अखिल भारतीय वेगवान बास्केटबॉल ड्रिबलर याची ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धा झाली. भारतामधून ७०० स्पर्धकांमधून अभिर गोखले याची प्रथम क्रमांकावर निवड झाली. या स्पर्धेच्या ५ डिसेंबर रोजी झालेल्या अंतिम फेरीत ‘फास्टेस्ट बॉल हँडलर ऑफ इंडिया’ हा किताब देण्यात आला. त्याला प्रशिक्षक संदीप खोत यांनी प्रशिक्षण दिले. वडील विक्रांत गोखले, कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सेक्रेटरी डॉ. शरद बनसोड, नितीन दळवाई, विनायक साळोखे, अमित दलाल, तेजस्विनी महाडिक, नीलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.