शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Kolhapur: शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत; हातकणंगले गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 16:13 IST

निविष्ठा खरेदीसाठी उपयोग 

आयुब मुल्लाखोची: खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्केपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. या तालुक्यातील इ पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्यासाठी ५ कोटी ७४ लाख ३९  तर गडहिंग्लज तालुक्यासाठी ५ कोटी ९५ लाख ४४ हजार रुपयांचे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना मिळेल.खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची दखल घेत राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात  आला होता.खरीप हंगामात हातकणंगले तालुक्यात सरासरी च्या ९० टक्के तर गडहिंग्लज मध्ये ९८ टक्के पेरणी झाली होती.दोन्ही तालुक्यात अनुक्रमे २० व २८ हजार हेक्टर जिरायत क्षेत्र आहे.परंतु ई पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक शेतकरी या कृषी विषयक मदतीपासून वंचीत राहणार आहेत.सुमारे तीस टक्के इतक्या पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.कृषी निविष्ठासाठीचे  अनुदान म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हेक्टरी ८हजार ५०० रुपया प्रमाणे ही मदतीची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हातकणंगले तालुक्यात सोयाबीन,भुईमूग,तुर,मूग,उडीद अशा पिकांचे  निकषाप्रमाणे ६ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र निश्चित झाले.त्यानुसार १७ हजार ३४४ शेतकऱ्यांना ५ कोटी ७४ लाख ३९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.तर गडहिंग्लज मध्ये ६ हजार ८६७ हेक्टर इतके क्षेत्र निश्चित होवून १६ हजार ७२० शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.निविष्ठा खरेदीसाठी उपयोग शेतकऱ्यांना मिळणाऱ्या  या मदतीतून कोणत्याही प्रकारची म्हणजे कर्जवसुली किंवा अन्य कोणतीही वळती करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे निविष्ठा खरेदीसाठीच याचा उपयोग होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ