शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

शेतकऱ्यांच्या भारत बंदला गडहिंग्लजकरांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 11:47 AM

Farmar, Gadhinglaj, Kolhapurnews सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून कायदे करण्याचा सपाटा केंद्रातील भाजपा सरकारने सुरू ठेवला आहे. भांडवलदारांच्या हितासाठीच ही दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशाला हुकूमशाहीचा धोका आहे, असे मत जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या भारत बंदला गडहिंग्लजकरांचा पाठिंबादेशाला हुकूमशाहीचा धोका : श्रीपतराव शिंदे : सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

गडहिंग्लज : सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून कायदे करण्याचा सपाटा केंद्रातील भाजपा सरकारने सुरू ठेवला आहे. भांडवलदारांच्या हितासाठीच ही दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशाला हुकूमशाहीचा धोका आहे, असे मत जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (८) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील सर्वपक्षीय बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. शिंदे होते. येथील नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली.शिंदे म्हणाले, अंबानी आणि अदानी यांच्या हिताचीच सरकारला काळजी आहे. कार्पोरेट कंपन्यांच्यामार्फत शेतीमाल खरेदी करण्याचे सरकारचे धोरण आहे. कांहीकाळ त्या कंपन्या शेतीमालाला चांगला भाव देतील. परंतु, त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला मर्यादा राहणार नाही.यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, ह्यभाकपह्णचे कॉ. दशरथ दळवी, काँगे्रसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंड्या पाटील, दलित महासंघाचे प्रकाश कांबळे यांचीही भाषणे झाली.बैठकीस जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, गडहिंग्लज व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजशेखर यरटे, तम्माण्णा पाटील, नगरसेविका सुनिता पाटील, क्रांतीदेवी शिवणे आदी उपस्थित होते. जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी प्रास्तावित केले. सागर पाटील यांनी आभार मानले.आज व्यापाऱ्यांची बैठकशेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका पटवून देवून बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्स व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवार दुपारी १ वाजता आयोजित पालिका सभागृहात बोलविण्यात आली आहे.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर