शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी विधान भवनावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:20 IST

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारा जिल्ह्यांतील शेतकरी एकवटले

कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत बुधवारी (दि. १२) अधिवेशन काळात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विधान भवनावर १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.आझाद मैदानात सकाळी ९ वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून, राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी येणार असून, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शविला होता. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वात लागल्याने सत्ताधारी हादरले आहेत. त्यातूनच स्थानिक नेत्यांना पुढे करत महामार्गाला समर्थन असल्याचे ते भासवत असल्याचे फोंडे यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांनी किती शेतकऱ्यांशी चर्चा केली?शक्तिपीठ महामार्गाला समर्थन असणाऱ्या आमदारांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावीत. महामार्गाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करणार म्हणता मग, गेल्या वर्षभरात किती शेतकऱ्यांशी चर्चा केली, हे सांगावे, असे फाेंडे यांनी म्हटले आहे.

निवडणूक झाल्यानंतर शब्द फिरवलाविधानसभा निवडणुकीत काेल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहून मवाळ भूमिका घेतली. आता निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याचे फोंडे यांनी म्हटले आहे.

उद्योगपतींचे खिशे भरण्यासाठीच महामार्गमराठवाड्यातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गापेक्षा शेती व पिण्याला पाणी हवे आहे. मात्र, सरकारने उद्योगपतींचे खिशे भरण्यासाठी महामार्गाचा घाट घातल्याचे फोंडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलनSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलvidhan sabhaविधानसभा