शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

Kolhapur News: हुसकावताना गवा बिथरला, हल्ल्यात शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:52 IST

गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आले नाकीनऊ

पोर्ले तर्फ ठाणे : वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेल्या गव्याच्या हल्ल्यात कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.माजगाव परिसरातील तरुणांनी गोंधळ करून गव्याला कसबा ठाण्याच्या डोंगरात हुसकावून लावले होते. बिथरलेल्या गव्याने समोरून येणाऱ्या माणिक पाटील यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा हाकनाक बळी गेला असल्याची चर्चा घटनास्थळी होती. शेतकऱ्यावर हल्ला करून मक्याच्या शेतात बसलेल्या गव्याला बघायला लोकांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आले.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,वाघजाई डोंगरावरील कळपातून चुकलेला गवा सातार्डे, पडळ मार्गे रविवारी (दि.२६) सकाळी माजगावाच्या शिवारात दिसला. गव्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. डोंगराच्या दिशेने हुसकावण्यासाठी लोकांनी आरडाओरड करत गोंधळ घातला तसेच दगड आणि काठ्या फेकून मारल्या त्यामुळे गवा बिथरला असल्याचे वनपाल नाथा पाटील यांनी सांगितले.दुपारी गव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने कसबा ठाण्याच्या डोंगराच्या दिशेने घालविले. त्यानंतर डोंगर उतरून गवा कसबा ठाणे गावाच्या शिवारात गेला. दरम्यान माणिक पाटील पायवाटेने वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेला गव्याने त्यांच्यावर समोरून हल्ला केला. त्यांना धडक देऊन पोटात शिंग खूपसून जखमी केले. आशिष पाटील आणि सुहास पाटील यांनी जखमी अवस्थेत त्यांना बाहेर आणले माणिक पाटील यांचा उपचारापूर्वीच वाटेत मृत्यू झाला.हकनाक बळीगवे शिवारात किंवा लोकवस्तीत आले की, त्यांना पाहण्यासाठी किंवा हुसकावण्यासाठी लोक गर्दी करतात. वर्षापूर्वी हुसकावताना भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर भुदरगड तालुक्यात शेतकऱ्याचा गव्याच्या धडकेत मृत्यू झाला होता. याचा बोध नसलेल्या माजगाव परिसरातील युवकांनी गव्याच्या पाठी लागून गोंधळ केला आणि त्याला बिथरवले. गव्याचे चित्रीकरण करण्यासाठी अनेक युवकांनी त्याच्यामागे जाण्याचा धाडसी प्रयोग केला. सोशल मीडियावर फोटो किंवा चित्रीकरण लवकर टाकण्याची हौस जीवावर बेतण्याची भीती तरुणांत दिसत नव्हती. वनविभागाचे अधिकारी लोकांना समजवून सांगत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु माजगावात केलेल्या गोंधळाने कसबा ठाण्यातील शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला.पोर्लेत गव्यांचा कळप आढळलापोर्ले तर्फ ठाणे येथील साळोखे आणि काशिद शिवारात पाच गव्यांचा कळप अन्नाच्या शोधात आला होता. रात्री शिवारात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गवे आढळले. सकाळी त्यांना मार्ग न सापडल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील तीन गवे डोंगराच्या दिशेने गेले, तर दोन गवे उसाच्या शेतात बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूforest departmentवनविभाग