शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Kolhapur: सायकलवरुन सुरु झालेला 'फरहान'चा प्रवास पोहोचला 'आयएएस'पर्यंत

By पोपट केशव पवार | Published: April 17, 2024 4:23 PM

शिष्यवृत्तीचा आधार

पोपट पवारकोल्हापूर : घरची परिस्थिती बेताचीच, मात्र, त्याचा कधीच बाऊ न करता प्राथमिक शिक्षणापासून ते अभियंता होईपर्यंत सायकलनेच त्याच्या आयुष्याला गती दिली. सायकलवरून सुरू झालेला प्रवास त्याला थेट आयएएस अधिकाऱ्यापर्यंत घेऊन गेला. यूपीएससी परीक्षेत देशात १९१ वी रँक मिळाल्यानंतर आजी, आत्या, चुलते, वडील अनेकांच्या कौतुक वर्षावात चिंब भिजत असताना आईसह तो मात्र सायकलची आठवण काढून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात गुंग होता.कोल्हापुरातील कदमवाडीच्या कारंडे मळा येथे राहणाऱ्या फरहान इरफान जमादार याची ही गोष्ट. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर फरहानवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कष्टाळू असणाऱ्या फरहानचे अभिनंदन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी जमादार परिवारासह त्यांचा गोतावळा जमला. कदमवाडीतील सुसंस्कार विद्यालयातून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर फरहानने विवेकानंद कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतले. पुढे सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. त्याच कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविल्याने फरहानला गोडी लागली. 'व्हायचे तर आयएएस'च ही खूणगाठ मनाशी बांधत त्याने स्पर्धा परीक्षेचा संकल्प सोडला.इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये त्याने नोकरी न करता कोल्हापुरातील खासगी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. घर ते अभ्यासिका अंतर जास्त होते. मात्र, रोज सकाळी सात वाजता सायकलवरून अभ्यासिका गाठायची ते थेट रात्री ११ वाजताच घरी परतायचे. हा संघर्षाचा दोन वर्षांचा दिनक्रम फरहानने कधी चुकविला नाही. यूपीएससीच्या २०२२ मध्ये मेन्समध्ये अपयश आले. मात्र, मित्र आणि कुटुंबाने कमालीचा धीर दिल्यानेच यातून सावरत पुन्हा तयारी सुरू केल्याचे फरहान सांगतो. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला तरी हिम्मत हरलो नाही. पुढे दिल्लीत जाऊन या परीक्षेची तयारी केली. रोज १२-१२ तास अभ्यास हेच ध्येय ठेवत ते अंमलात आणल्यानेच यशाला गवसणी घालू शकल्याचे प्रांजळ भावनाही त्याने मांडली.

शिष्यवृत्तीचा आधारस्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना इरफानला शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे कुटुंबावर तितकासा आर्थिक ताण आला नाही. कोल्हापुरातील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या प्रमुख लता देवाप्पा जाधव यांच्यासह अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

आजी, आईला अभिमानजमादार कुटुंब हे सुशिक्षित आहे. वडील इरफान यांचा प्रिंटिंगचा व्यवसाय तर आई गृहिणी. पोराने अभूतपूर्व यश मिळवल्याने आई-वडिलांसह आजी मुमताजलाही 'काय कररू नी काय नको' असे झाले होते.

रोज बारा बारा तास अभ्यास केला. अपयश आले म्हणून थांबलो नाही, हिम्मत हरलो नाही. त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. -फरहान जमादार,

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग