शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात १५ नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम, सीमाभागातील साखर कारखान्यांना दिलासा 

By राजाराम लोंढे | Updated: September 16, 2024 14:03 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळामुळे कर्नाटकात उसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळामुळे कर्नाटकात उसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम १५ नोव्हेंबर नंतरच सुरू करावा, असे आदेश कर्नाटक सरकारने कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या अगोदर हंगाम सुरू होऊन उसाची होणारी पळवापळवी थांबणार असल्याने सीमाभागातील साखर कारखान्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.कर्नाटकातील विशेषत: उत्तर भागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासूनच सुरू होतो. महाराष्ट्राच्या अगोदर साधारणत: महिनाभर हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमा भागातील उसाची पळवापळवी होते. त्यामुळे सीमाभागातील साखर कारखान्यांच्या हंगामावर परिणाम होतो.मात्र, गेल्यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटकात पाऊस कमी झाला. कर्नाटकात वार्षिक सरासरीच्या जेमतेम ६० टक्केच पाऊस झाल्याने काही तालुक्यात उसाची लागवड कमी झाली. त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर होणार आहे. उसाची उपलब्धता कमी असल्याने यंदा गळीत हंगाम १ डिसेंबरला सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. कर्नाटक साखर संघ व सरकार यांनी १५ नोव्हेंबरच्या पुढे हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

उशिरा हंगामाचे फायदे 

  • कमी कालावधीच्या उसात पाण्याचे प्रमाण खूप असते.
  • परिपक्व उसाचे गाळप केल्यास शेतकऱ्यांना वजनही चांगले मिळते.
  • साखर उतारा चांगला मिळाल्याने कारखान्यांचाही फायदा होतो.
  • साधारणत: १३ ते १४ महिन्यांच्या उसाचे गाळप शेतकरी व कारखान्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.

मंत्री समितीची बैठक आणि आचारसंहितासाखर हंगामाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीची बैठक वेळेत होणे गरजेचे असते. या बैठकीत हंगामाबाबत धोरण ठरवले जाते. कर्नाटक सरकारने हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने १ नोव्हेंबरपासून परवानगी दिली तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. मात्र १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. तत्पूर्वी बैठक घेणे गरजेचे आहे.

कर्नाटक सरकारचा हा निर्णय सीमाभागातील कारखान्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्री समितीची बैठक लवकर घेतली तर कारखान्यांना हंगामाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. - पी. जी. मेढे (साखर उद्योजक अभ्यासक)

टॅग्स :Karnatakकर्नाटकSugar factoryसाखर कारखाने