कोल्हापूर मनपा प्रशासकांच्या नावाने बनावट व्हॉट्स ॲप अकौंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:12 IST2025-09-03T13:11:59+5:302025-09-03T13:12:53+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या फोटोचा वापर करून खासगी व्हॉट्स ॲप अकौंटवरून मेसेजेस फिरत असल्याचे निदर्शनास ...

कोल्हापूर मनपा प्रशासकांच्या नावाने बनावट व्हॉट्स ॲप अकौंट
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या फोटोचा वापर करून खासगी व्हॉट्स ॲप अकौंटवरून मेसेजेस फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हे अकौंट हे प्रशासकांचे अधिकृत अकौंट नसून त्यावरून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. कोणीही अशा खोट्या अकौंटवरून फिरणारे मेसेज व्हायरल करू नयेत तसेच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अथवा इतर मागणीस प्रतिसाद देऊ नये.
महापालिकेचा अधिकृत संपर्क क्रमांक ९७६६५३२००१ असा असून, याशिवाय अन्य कोणत्याही व्हॉट्स ॲप अकौंटवरून प्रशासकांचा फोटो वापरून पाठविण्यात येणाऱ्या संदेशांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.