शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कारखान्यांना मिळणार ३९३ कोटी रुपये

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम : आधारकार्ड व बँक खाते लिंकिंगसाठी कारखान्यांच्या हालचाली

प्रकाश पाटील - कोपार्डे -हंगाम २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या उसाची देणी थकली असून, यासाठी केंद्र शासनाने सहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज २०१३-१४ मध्ये उत्पादित साखरेच्या केवळ ११ टक्के कोट्यावरच २४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे मिळणार आहे. याप्रमाणे ३९३ कोटी २५ लाख ६१ हजार ४२४ रुपये रक्कम जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उपलब्ध होणार आहे.ज्या साखर कारखान्यांनी २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये साखर उत्पादन केले आहे, अशा साखर कारखान्यांना हंगाम २०१४-१५ मध्ये साखरेचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची थकीत देणी देणे अवघड झाल्याने अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने सहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यात हंगाम २०१३-१४ मध्ये उत्पादन केलेल्या उत्पादनाच्या ११ टक्के साखरेवर प्रतिक्विंटल २४०० रुपये बँकांनी कारखान्यांना कर्ज म्हणून उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. या कर्जाचे पहिल्या वर्षाचे १० टक्क्यांप्रमाणे व्याज केंद्र शासन बँकांना अदा करणार आहे. त्याच्या पुढील व्याजाची जबाबदारी शासनाने घेतलेली नाही.ज्या साखर कारखान्यांनी हंगाम २०१४-१५ मधील उसाची ५० टक्के एफआरपी अदा केली आहे, अशांनाच ही रक्कम मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ५० टक्क्यांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दिल्याने हे पॅकेज मिळण्यास जिल्ह्यातील कोणत्याच कारखान्यांना अडचण येणार नाही. हे कर्ज ३० सप्टेंबरपर्यंत वितरित केले जाणार असून, ते साखर कारखान्याऐवजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंकिंग करण्यासाठी साखर कारखान्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.एन.पी.ए. असणाऱ्या कारखान्यांना पॅकेज मिळविण्यासाठी अवघड बनले असून, केंद्र शासनाने जे राजपत्र जाहीर केले आहे, त्यात उणे नक्त मूल्य असणाऱ्या कारखान्यांच्या कर्जाची हमी राज्य शासनाने दिली तरच अशा कारखान्यांना हे कर्ज मिळणार आहे. शासनाने विनाअट लवकरात लवकर पॅकेजचे पैसे उपलब्ध करून द्यावेत. त्याची परतफेडीची मर्यादा वाढवून व्याजाची जबाबदारी शासनाने घ्यावी; अन्यथा अशा साखर दरातून मार्ग काढणे कठीण होईल. पुढील हंगामात कारखाने सुरू झाले नाहीत, तर उभ्या उसाला शासनाला पैसे द्यावे लागतील.- आ. चंद्रदीप नरके, अध्यक्ष, कुंभी साखर कारखाना)दोन ते तीन टक्के व्याजाचा बोजासध्या सर्वच बँकांच्या कर्जावर व्याजदर १२ ते १३ टक्के आहे. केंद्र शासन या कर्जावर केवळ १० टक्के व्याज भागविणार असल्याने दोन टक्के व्याज कारखानदारीवरच पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना मिळणाऱ्या पॅकेज रकमेचा विचार केल्यास दोन टक्क्यांप्रमाणे ७ कोटी ८६ लाख ५१ हजार २२८ रुपये व्याजाचा बोजा कारखान्यांना सोसावा लागणार आहे.कारखानदारांची अथवा कारखान्यांची मालमत्ता तारण देण्याची अटहे कर्ज देताना व्यक्तिगत जबाबदारी अथवा कारखान्याची मालमत्ता तारण द्यावी लागणार आहे. बहुतांश कारखान्यांनी पूर्वीच्या कर्जाला अशी कारखान्याची मालमत्ता तारण ठेवल्याने आता कुठली मालमत्ता द्यावयाची? हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे ही अट शिथिल करावी, अशी मागणी होत आहे.