जयंत पाटील यांचे पद अडचणीत

By Admin | Updated: July 5, 2015 00:55 IST2015-07-05T00:55:34+5:302015-07-05T00:55:34+5:30

जिल्हा बँक : निवडीस आव्हान देण्याच्या हालचाली

In the face of Jayant Patil's post | जयंत पाटील यांचे पद अडचणीत

जयंत पाटील यांचे पद अडचणीत

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ज्ञ संचालक प्रा. जयंत पाटील यांचे पद अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडीला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या एका आदेशाचा आधार घेतला जात आहे.
महापालिका निवडणुकीतील जोडण्या करण्यासाठी त्यांना जयंत पाटील यांची गरज आहे. त्यामुळे त्यांना सत्तेचे पद असावे, म्हणून बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असतानाही त्यांना आता तज्ज्ञ संचालक म्हणून मागील दाराने बँकेत घेतले आहे. त्यांच्या निवडीला पतसंस्था गटातून पाटील यांचाच पराभव करून विजयी झालेले अनिल पाटील यांनी विरोध केला आहे. नुसता संचालक मंडळामध्ये विरोध करून न थांबता त्याविरोधात तक्रार करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
तज्ज्ञ संचालक नियुक्ती कशी करावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने ५ एप्रिल २००२ ला काही मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. त्यानुसार बँकेच्या संचालक मंडळावर दोन तज्ज्ञ संचालक घेता येतात. परंतु, त्यांनी बँकेच्या व्यवस्थापनाच्या मधल्या फळीत काम केल्याचा दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजे सीए, आयसीडब्लू, सीएस किंवा निवृत्त बँक अधिकारी अथवा बँकिंगसंबंधी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हवेत. ‘केडीसीसी’ ही जिल्हा म्हणजे फेडरल बँक आहे. त्यामुळे हा आदेश लागू होतो का, यासंबंधी संदिग्धता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the face of Jayant Patil's post