शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

कोल्हापूर जिल्ह्यात आढळला अत्यंत दुर्मीळ ‘कॅस्टोए कोरल स्नेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:17 IST

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या अत्यंत दुर्मीळ सापाची पहिली ...

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या अत्यंत दुर्मीळ सापाची पहिली नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून करण्यात आली आहे. या नव्या नाेंदीमुळे या जिल्ह्यातील सापांच्या यादीत भर पडली असून सरिसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सापाच्या अधिवासामुळे आंबोली आणि आजरा परिसरातील समृद्ध जैवविविधता अधोरेखित झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ओंकार यादव, शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी मयूर जाधव, स्वप्निल असोदे, सौरभ किनिंगे आणि शुभम कुरुंदवाडकर यांनी ही नोंद केली. ‘Reptiles and Amphibians’ या आंतराष्ट्रीय नियतकालिकामध्ये ही नोंद प्रसिद्ध झाली आहे.

यापूर्वी या सापाची नोंद सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी व सहकाऱ्यांनी २०१३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथून केली होती. त्यानंतर त्याचे वास्तव्य गोवा आणि कारवार (कर्नाटक) येथेही आढळले होते. २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यामधील होनेवाडी आणि मडिलगे या ठिकाणांवरून या सर्पाची नोंद झाल्याने याचा अधिवास समृद्ध ठिकाणी असल्याचे सिध्द झाले आहे. मडिलगे येथे हा सर्प प्रथम आढळला. त्यानंतर होनेवाडीमध्ये हा साप मृत अवस्थेत आढळला.

या सापाची निरीक्षणे आणि छायाचित्रे सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांना पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी हा साप कॅस्टोए कोरल स्नेक असल्याचे सांगितल्यानंतर यासंदर्भातील शोधनिबंध ‘Reptiles and Amphibians’ या आंतराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला.

कोट

प्रामुख्याने आंबोलीत आढळणारा हा साप अतिशय विषारी असून जमिनीखाली जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी आढळतो. या सापाबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसली तरी आशिया आणि अमेरिका खंडात केवळ ४०० प्रजाती आढळतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो साधारण तीन फूटापर्यंत आढळतो आणि त्याचा पोटाखालचा भाग लाल असतो. यामुळे आजरा आणि आंबोलीतील जैवविविधता अधोरेखित झाली आहे.

- डॉ. वरद गिरी, सरीसृप तज्ज्ञ

--------------------------------------

फोटो : 17072021-kol-Castoe’s Coral snake/17072021-kol-Castoe’s Coral snake1

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात कॅस्टोए कोरल स्नेक दुर्मीळ सापाची पहिली नोंद करण्यात आली आहे.

170721\17kol_9_17072021_5.jpg~170721\17kol_10_17072021_5.jpg

फोटो : 17072021-kol-Castoe’s Coral snake/17072021-kol-Castoe’s Coral snake1फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात कॅस्टोए कोरल स्नेक दुर्मिळ सापाची पहिली नोंद करण्यात आली आहे. ~फोटो : 17072021-kol-Castoe’s Coral snake/17072021-kol-Castoe’s Coral snake1फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात कॅस्टोए कोरल स्नेक दुर्मिळ सापाची पहिली नोंद करण्यात आली आहे.