शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

कोल्हापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 4:47 PM

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचा छोटा गट असलेली समिती रद्द करून, राज्यशासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांत होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीनियोजन विभागाचा आदेश : दोन दिवसांत होणार बैठक

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीचा छोटा गट असलेली समिती रद्द करून, राज्यशासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांत होणार आहे.यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळापुढे जी कामे मंजुरीसाठी येतात, त्याची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाचजणांची समिती होती. त्यास छोटा गट म्हटले जाई. या समितीत आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे हेमंत कोलेकर, विजय सूर्यवंशी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांचा समावेश होता.

ही समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असल्याने प्रस्तावावर निर्णय घेण्यात मर्यादा येत होत्या; त्यामुळे अगोदरची समिती बरखास्त करून, नव्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यास फेब्रुवारीतच मंजुरी दिली जाणार आहे; त्यामुळे त्यापूर्वी त्यातील प्रस्तावांची छाननी व्हावी, यासाठी या कार्यकारी समितीची बैठक येत्या दोन दिवसांतच घेण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.नव्या समितीचे स्वत: पालकमंत्री पाटील हेच अध्यक्ष असल्याने कोणत्या प्रस्तावांना नियोजन समितीच्या आराखड्यात समाविष्ट करायचे व कोणत्या नाही याचा निर्णय कार्यकारी समितीच्या पातळीवरच होणार आहे. अधिकाराच्या पातळीवर ही समिती जास्त सक्षम मानली जाते.

अशी आहे समितीअध्यक्ष - पालकमंत्री कोल्हापूरविशेष निमंत्रित सदस्य : खासदार संभाजीराजे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर व भाजपचे कार्यकर्ते राजाराम शिपुगडे.सदस्य : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कोल्हापूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील