शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

विनाअनुदानित शाळा समितीचा बारावी, दहावीच्या परीक्षांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:57 PM

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार ...

ठळक मुद्दे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आत्मक्लेश आंदोलन; पुणे येथून सोमवारपासून पायी दिंडी

कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मक्लेश आंदोलनाअंतर्गत समितीच्या वतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडीची सुरुवात सोमवारी (दि. १७) होईल. त्याबाबतचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे लेखाधिकारी सुनील रेणके यांना दिले.

वीस टक्के अनुदानपात्र सर्व शाळांना २९ जानेवारी २०२०च्या शासन निर्णयानुसार फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करून १०० टक्के अनुदान द्यावे. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी कृती समितीचा लढा सुरू आहे. या मागण्यांची पूर्तता करून विनाअनुदानित शाळा आणि शिक्षकांना शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, गजानन काटकर, जनार्दन दिंडे, शिवाजी खापणे, आनंदा वारंग, शिवाजी घाडगे, मच्छिंद्र जाधव, सावंत माळी, भानुदास गाडे, केदारी मगदूम, आदींचा समावेश होता.

विनाअनुदानित शिक्षक गेल्या २० वर्षांपासून शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत; पण अनेक प्रश्न, मागण्या अजून प्रलंबित आहेत. त्याच्या पूर्ततेबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. बहिष्काराच्या आंदोलनात राज्यातील ६५०० हजार विनाअनुदानित शाळा आणि त्यामधील सुमारे ४० हजार शिक्षक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. पायी दिंडीची सुरुवात पुणे येथे सोमवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता होईल. आठ दिवसांत दिंडी मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.- खंडेराव जगदाळे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीexamपरीक्षा