शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिक हक्काच्या पेन्शनपासून वंचित का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:57 IST

अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी कोल्हापूर टेरिअर संघटनेच्या कार्याला बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे एक एकर जमीन देण्याची घोषणा केली. तसेच ओरस येथे संघटनेला कार्यालय, आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी दरवर्षी १० मुलांना शिष्यवृत्ती देणार असल्याचेही सांगितले.

ठळक मुद्दे-कोल्हापूर टेरिअर परिवारच्या स्नेहमेळाव्यात मांडल्या व्यथा

कोल्हापूर : सैनिक आपल्या घराची-मुलाबाळांची चिंता न करता जिवाची बाजी लावून देशसेवेसाठी आयुष्य वेचतात, अशा सैनिकांना निवृत्तीनंतर हक्काच्या पेन्शनपासून वंचित का राहावे लागते, अशा शब्दांत माजी सैनिकांनी रविवारी व्यथा मांडल्या.

येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये कोल्हापूर टेरिअर परिवाराचा दुसरा मिशन जिव्हाळा हा स्नेहमेळावा झाला. मेळाव्याचे उद्घाटन निवृत्त कर्नल व्ही. व्ही. दिनेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून केले. तसेच शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड, निवृत्त मेजर अ‍ॅड. चंद्रकांत पाटील, पी. ए. पंडितराव, ए. एम. देवघरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी कोल्हापूर टेरिअर संघटनेच्या कार्याला बळ देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे एक एकर जमीन देण्याची घोषणा केली. तसेच ओरस येथे संघटनेला कार्यालय, आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी दरवर्षी १० मुलांना शिष्यवृत्ती देणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, वीरमाता मनीषा सूर्यवंशी, वीरपत्नी तसेच आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क-हाडच्या शिवम प्रतिष्ठानच्या बालभाव सरिता वाद्यवृंदने देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी सृजनधारा वाद्यवृंदचे उद्घाटन प्रा. सुरेश शुक्ल यांच्या हस्ते झाले. टेरिअर परिवारचे अध्यक्ष आॅनररी सुभेदार मेजर संजय शिंदे, उपाध्यक्ष संजय पाटील, तानाजी चौगले, शिवाजी पाटील, यशवंत सूर्यवंशी यांनी संयोजन केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर